Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब; अवकाळी पावसामुळे पाणीसाठा ९७ टक्क्यांवर!

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला मोठा दिलासा! अवकाळी पावसामुळे जायकवाडीसह प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. विभागातील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 31, 2025 | 06:15 PM
जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब (Photo Credit - X)

जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वच धरणे १०० टक्क्यांवर!
  • जायकवाडीत धरणातून पाचव्यांदा विसर्ग
  • सिंचनाचा प्रश्न मिटला
छत्रपती संभाजीनगर: परतीच्या पावसानंतरही हवामानातील अनपेक्षित बदलामुळे सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी सह मराठवाड्‌यातील बहुतेक सर्व प्रमुख धरणे १०० टक्के भरली आहेत. परिणामी विभागातील पिण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला असून, समाधान व्यक्त होत आहे. यंदा मान्सूनच्या चार महिने पावसाने दमदार साथ दिली. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला तर अतिवृष्टीने मोठे नुकसान केले. नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतीपिकांसह घरे, गायगोठ्यांचेही नासधूस झाली.

११ धरणे तुडुंब भरली

एकीकडे असे नुकसान झालेले असताना असताना दुसरीकडे विभागातील धरणांमध्ये भरमसाठ पाणीसाठा जमा झाला. जायकवाडीसह विभागातील प्रमुख ११ धरणे तुडुंब भरली. यात जायकवाडी सह अनेक धरणामधून विसर्ग करण्यात आला. जायकवाडीतुन यंदा चार ते पाच वेळा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पावसाळा संपला.

११ धरणांत ९७ टक्के साठा

ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली. मात्र दोन आठवडे कोरडे गेल्यानंतर, चक्रीवादळे आणि हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ते सत्र अद्याप सुरूच आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पुन्हा आवक सुरु झाल्याने बुधवार, २९ ऑक्टोबरपर्यंत प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. तर सिद्धेश्वर धरण ९८ टक्क्यांवर आहे. याशिवाय निम्न दुधना ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. परिणामी जायकवाडीसह अनेक धरणांमधून निसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. आजघडीला विभागातील प्रमुख ११ धरणांमध्ये एकूण ९७. ०६ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच ‘गोल्फ प्रीमियर लीग’! ३१ एकर जागेवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार

मराठवाड्यात ३८ टक्के अधिक बरसला पाऊस

यंदा जूनपासून आजतागायत झालेला पाऊस पाहता मराठवाड्‌यात ३८ टक्के अधिकच पाऊस झाला आहे. १ जून ते २९ ऑक्टोबरपर्यंत विभागाची सरासरी ७४६. २ मिमी इतकी आहे. तर झालेला पाऊस हा १०२९, ७ मिमी आहे. म्हणजेच एकूण १३८ टक्के पाऊस झाला आहे. हा सरासरीच्या ३८ टक्के अधिक आहे. मागील वर्षी १८. ९ टक्के अधिक पाऊस झाला होता हे विशेष. या पाणीसाठ्यामुळे भविष्यातील पिण्याची, सिंचनाची आणि उद्योगांसाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हवामानातील बदल पाहता नोव्हेंबरपर्यंत हा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

धरण संबंधित नदी पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
जायकवाडी गोदावरी १००.००
येलदरी पूर्णा १००.००
माजलगाव सिंदफणा १००.००
मांजरा मांजरा १००.००
पैनगंगा पैनगंगा १००.००
मानार मानार १००.००
निम्न तेरणा तेरणा १००.००
विष्णूपुरी गोदावरी १००.००
सीना कोळेगाव सीना १००.००
सिद्धेश्वर पूर्णा ९७.७९
निम्न दुधना दुधना ७५.५०
एकूण ११ धरणांचा साठा – ९७.०६

Chhatrapati Sambhajinagar Water Supply: शहरात नव्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात; १५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाण्याची चाचणी!

Web Title: Major dams in marathwada including jayakwadi are 100 full water storage at 97 due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada

संबंधित बातम्या

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक
1

Godavari Chit Fund Fraud: गोदावरी चिटफंडने डॉक्टर महिलेला लावला लाखोंचा चुना; बनावट कागदपत्रांच्या आधारे केली मोठी फसवणूक

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
2

Sambhajinagar MNC Election: छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची तयारी सुसाट! मतदानासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…
3

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा
4

१६ वर्षांनी पुन्हा शाळा भरली! माजी विद्यार्थी एकत्र, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.