या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल
मराठवाड्यातील महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्हे सर्वाधिक धोकादायक ठरले आहेत. गेल्या ३ वर्षांतील ब्लॅक स्पॉट्स आणि मृत्यूची आकडेवारी वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठवाडा रेल्वे उत्पादनाचे केंद्र बनत आहे. लातूरच्या रेल कोच फॅक्टरीत २६ मार्चपासून 'वंदे भारत' स्लीपर कोचचे उत्पादन सुरू होणार असून जून २०२६ पर्यंत पहिली रेल्वे तयार होईल.
Marathwada Khandesh Connectivity: कन्नड औट्रम घाटात ५.५ किमी लांबीचा बोगदा तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १२,६०० कोटींच्या या प्रकल्पामुळे खान्देश आणि मराठवाडा जोडला जाणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील १८ वसाहतींमधील ६०२ उद्योग बंद पडले आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आरोग्य विभागाच्या सीएसआर निधीवरही याचे सावट आहे.
अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."
Kumbh Mela 2027: जळगाव ते नाशिक विमानसेवा कुंभमेळ्यासाठी सुरू, पण पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दुर्लक्षित. वेरुळ दर्शनासाठी कनेक्टिव्हिटीची मागणी.
Uddhav Thackeray Marathwada: उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला मोठा दिलासा! अवकाळी पावसामुळे जायकवाडीसह प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. विभागातील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम गोल्फ लीग (MGM Golf League) चे पहिल्यांदाच आयोजन! ३१ एकर जागेतील कोर्सवर देशातील नामांकित गोल्फपटू खेळणार. मिलखासिंग यांचा मुलगा जीव मिलखासिंग उपस्थित राहण्याची शक्यता.
भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत. काल रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला.
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने शेतीचे, घरादारांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी उभा संसार पाण्याखाली गेल्याने ती मदत तुटपुंजी ठरण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले. वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे…