Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

Rohit Pawar : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरलं. खरिपात 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करत तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 20, 2026 | 08:01 PM
Rohit Pawar farmer issue

Rohit Pawar farmer issue

Follow Us
Follow Us:
  • खरिपात 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा रोहित पवारांचा दावा.
  • शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी.
  • ‘पुढील दहा महिने शेतकऱ्यांना जगवण्याचं आव्हान’; सरकारला तातडीच्या मदतीचं आवाहन.
 

Rohit Pawar : राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात तर परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत.

धाराशिव आणि बीड जिल्ह्यांनंतर रोहित पवार लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पंचनामे आणि मदत मिळत नसल्याबद्दल आपली नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली. पिकांची परिस्थिती पाहिल्यानंतर रोहित पवारांनी सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.

खरीप हंगामात 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं असून रब्बीचीही आशा मावळली आहे, असा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पुढील दहा महिने शेतकरी आणि सर्वसामान्यांना कसं जगवायचं, हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी

याच पार्श्वभूमीवर तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांसाठी राखून ठेवलेला निधी सध्याच्या संकटात शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. सरकारला पत्राद्वारे काही दिवसांची मुदत दिल्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाची भूमिका घेण्याचा शरद पवारांचा इतिहास असल्याचं त्यांनी म्हटलं.

“आज अजित पवार असते तर…”

“आज अजित पवार असते तर नियम आणि अटींमध्ये अडकले नसते,” असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेलं नेतृत्व म्हणून त्यांनी अजित पवारांचा संदर्भ दिला आणि महायुतीतील सध्याच्या नेत्यांवरही टीका केली.

मराठवाड्यातील पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि परिस्थितीचा अहवाल शरद पवार यांना देणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. आता सरकार दुष्काळाबाबत काय निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या मदतीची घोषणा होते, याकडे लक्ष लागलं आहे.

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

Web Title: Rohit pawar marathwada drought farmers shaktipith highway fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Marathwada
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
1

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil : ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो!’ मनोज जरांगे पाटील भावुक, फायनान्स कंपन्यांना दिला इशारा
2

Manoj Jarange Patil : ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो!’ मनोज जरांगे पाटील भावुक, फायनान्स कंपन्यांना दिला इशारा

Sharad Pawar Health Update:  शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी
3

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
4

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.