Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mathadi Workers Protest: राज्य सरकारच्या ‘त्या’ जीआरविरोधात माथाडी कामगारांचा एल्गार! १० हजार कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार

Mathadi Workers Protest News: राज्य सरकारच्या २४ एप्रिल २०२६ च्या जाचक जीआरविरोधात महाराष्ट्रातील १० हजार माथाडी कामगारांनी एल्गार पुकारला आहे. २७ मे पासून धान्य गोदामातील काम बंद करून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 27, 2026 | 02:09 PM
Mathadi Workers Protest: राज्य सरकारच्या ‘त्या’ जीआरविरोधात माथाडी कामगारांचा एल्गार! १० हजार कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार
Follow Us
Follow Us:

 

  • राज्य सरकारच्या ‘त्या’ जीआरविरोधात माथाडी कामगारांचा एल्गार!
  • १० हजार कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार
  • बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने काढलेल्या चुकीच्या आदेशामुळे, शासकीय धान्य गोदामातील सुमारे १० हजार माथाडी कामगार बेरोजगार होणार असून, त्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आणि धरणे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस अॅड. सुभाष सावंगीकर यांनी दिली. २५ ते २६ मे रोजी पुकारलेल्या या राज्यव्यापी ठिय्या, धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व गोदामातील हमाल कष्टकरी सहभागी झाले आहेत. तसेच बाजार समितीमधील आडत, किराणा, भाजी मार्केट, कारखाने आदी ठिकाणचे माथाडी कामगारदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. चळवळीच्या गीताने तसेच संविधान वाचनाने ठिय्या, धरणे आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी सांगितले कि, राज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाने २४ एप्रिल २०२६ च्या शासनादेशात, शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांवर अन्यायकारक जीआर काढला.

दहा हजार माथाडी कामगारांना फटका

परिणामी ३० ते ४० वर्षापासून गोदामात काम करणाऱ्या हमालांची सुमारे ९० टक्के काम कमी होणार असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. माथाडीशी संबंधित कोणतेही काम असेल तर त्याचे नियंत्रण, नियोजन, वेतन, थकबाकी पगार करणे आदी बाबींची पूर्तता करण्याची जिम्मेदारी, कायद्याने जिल्हा माथाडी मंडळावर दिलेली असताना, या जीआरमध्ये माथाडी मंडळांना पूर्णपणे बेदखल केले गेल्याचेही त्यानी निदर्शनास आणून दिले. पुरवठा विभागाने परिपत्रकातील चूक तात्काळ दुरुस्त केली नाही तर, आज २७ मे पासून जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील सर्व काम बंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा; महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदनाद्वारे घातले साकडे

आंदोलनाला जगन्नाथ काळे, सुभेदार मेजर सुखदेव बन, राजेंद्र जेधे, जगन भोजने, फारुखभाई, युसूफभाई, सचिन पगारे, संजू पवार, सुनील अडगळे, विजय खंडागळे, सत्तारभाई, प्रभाकर गायकवाड, कैलास वाघ, गौतम बनकर, सचिन दिवेकर, समीर शेख, अशोक तेलगोटे, देविदास किर्तीशाही, प्रवीण सरकटे यांचा पाठिंबा मिळाला तर आंदोलनात सर्जेराव जाधव, साथी बाळू हिवराळे, साथी अली खान, साथी भारत गायकवाड, साथी रुपेश लोने, राजू हातागळे, नन्नावरे, कल्याण तुपे, प्रवीण पगारे, राहुल त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरवठा विभागाने काढलेले परिपत्रकच बेकायदेशीर

वेतन ठरवून पगार करण्याची जबाबदारी जर कायद्याने माथाडी मंडळावर दिली असेल तर, जीआरद्वारे सदरील जबाबदारी काढून घेण्याचा अधिकार पुरवठा विभागाला कोणी दिला ? असा प्रश्न लोमटे यांनी यावेळी उपस्थित केला. पुरवठा विभागाचे सदरील परिपत्रकच बेकायदेशीर असल्याने ते तात्काळ रद्द करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कामगारांच्या या आहेत मागण्या माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. माथाडी कामगारांना, पोलिस संरक्षण देऊन पूर्ववत कामावर पाठवावे. वेतनवाढीचे करार निर्धारित वेळेत करावे. थकबाकी वसुली निश्चित कालमर्यादेत वसूल करावी. वेळेवर पगार न करणारांना दंडित करावे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ; चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!

Web Title: Mathadi workers launch a massive uprising against that state government gr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mathadi workers
  • Protest

संबंधित बातम्या

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप
1

Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी
2

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

Vasai : खड्ड्यांविरोधातील उपोषणाचा आठवा दिवस; विवेक यांची प्रकृती ढासळली, आंदोलन स्थगित
3

Vasai : खड्ड्यांविरोधातील उपोषणाचा आठवा दिवस; विवेक यांची प्रकृती ढासळली, आंदोलन स्थगित

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.