Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मेळाव्यात निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या आगामी रणनीतीची घोषणा केली असून मनसे आता ग्रामपंचायत निवडणुका लढवणार आहे. तसेच शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणी त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 02:07 PM
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मेळाव्यात निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मेळाव्यात निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार

Follow Us
Follow Us:
  • मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मेळाव्यात निर्धार
  • ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार
  • शिक्षित तरुणांना मनसेशी जोडा
छत्रपती संभाजीनगर: राज्यात सध्या ज्या पध्दतीचे राजकारण सुरु आहे, ते आजच्या पिढीला राजकारणात येण्यापासून रोखणारे आहे. तरुण राजकारणी झाले नाही तर बाद होणारे राजकारणी कसे बाहेर पडणार? मनसे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाऊल टाकणार असल्याने तरुणांनी त्यांच्याबरोबर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेऊन महिलांना देखील पक्षाशी जोडण्याचे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संभाजीनगरात केले.

निराला बाजार येथील तापडिया नाट्‌यगृहात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा नव संकल्प मेळावा पार पडला, त्यावेळी नांदगावकर बोलत होते. ते म्हणाले, ‘तुम्ही मोठे झाला तर पक्ष आपोआप मोठा होतो. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा.

चौकशी सीआयडीमार्फत करा

जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले वेरूळ येथील सुरेश बोरसे यांचा मारहाणीमुळे झालेला मृत्यू हा एक खूनच असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. यात दोन पोलिसही आरोपी आहेत. मात्र, खुनाचा गुन्हा नोंदवण्याऐवजी संबंधित पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली.

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

शिक्षित तरुणांना मनसेशी जोडा

सध्या इतर पक्षात प्रवेश सोहळे सुरू आहेत. त्याचा भाव काय आहे? मनसेत तसे काही नाही. येथे लोक प्रेमाने येतात. पक्षाला झेंडे, हारतुरे किंवा ढोलताशांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्ता हवा. दिखाऊ स्वागत पेक्षा संघटनात्मक ताकदीला महत्त्व द्या. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नवीन आणि शिक्षित तरुणांना मनसेची जोडून राजकारणात आणा, असेही नांदगावकर म्हणाले.

सहभागावर नाराजी

आजच्या नव संकल्प मेळाव्यात महिलांची उपस्थिती अल्प दिसून आल्याने नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. आता महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण असेल. त्यामुळे पक्षात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

‘ऑपरेशन टायगर’साठी ठेकेदाराचे 600 कोटी; ठाकरे गटाचे माजी खासदार खैरे नेमकं काय म्हणाले?

Web Title: Mns leader bala nandgaonkar resolves at a rally to contest the gram panchayat elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार
1

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
2

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत
3

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार
4

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.