Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील निकृष्ट गणवेशाबाबत शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई आणि ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 07:18 PM
गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

Follow Us
Follow Us:
  • गणवेशाची होणार अचानक तपासणी
  • गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत
शिवाजी डापके । नवराष्ट्र सिल्लोड: सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद व शासनमान्य शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या गणवेशाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गणवेशाच्या कापडाचा दर्जा, शिवणकामाची गुणवत्ता आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची अचानक तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे कापड वापरल्याचे अथवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादार व कंत्राटदारांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत पालक आणि शिक्षकांकडून वेळोवेळी तक्रारी समोर येत होत्या.

कपड्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचीही तयारी

काही ठिकाणी कमी प्रतीचे कापड वापरल्याने गणवेश अल्पावधीत फाटणे, रंग उडणे अथवा शिवणकाम निकृष्ट असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतर्गत शिक्षण विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अंगावरील गणवेशाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार कापडाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचीही तयारी करण्यात आली आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या पुरवठादारांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह भविष्यातील निविदा प्रक्रियेतून वगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mira Bhayandar News : शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता

सुविधांवर खर्च

शासनाकडून विद्याथ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना त्याचा दर्जेदार लाभ विद्याथ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्याथ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

गणवेश निधीची स्थिती

विद्यार्थ्यांना गणवेशासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून योजना राबविली जाते. बहुतांश निधी वितरित झाला तर उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. निधीचा योग्य वापर व दर्जेदार गणवेश पुरवठ्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.

८८ विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाचा निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाचा पुरवठा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सिल्लोड तालुक्यात अचानक तपासण्या घेऊन संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली जाणार आहे. शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक

 ‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

Web Title: School uniform quality check in sillod primary education director sharad gosavi warns contractors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • School

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
2

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
3

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.