Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

छत्रपती संभाजीनगरमधील आझाद कॉलेज परिसरात बहिणीच्या प्रवेशासाठी गेलेल्या मुझाईद कुरेशी या २४ वर्षीय तरुणावर सुफियान पठाण आणि त्याच्या साथीदाराने चाकूने जीवघेणा हल्ला केला. जखमीवर घाटीत उपचार सुरू आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 02:30 PM
धक्कादायक घटना! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)

धक्कादायक घटना! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक घटना!
  • बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला
  • आझाद कॉलेज परिसरातील थरार
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी: बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर दोघांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर घाटीत उपचार सुरू आहेत. ही घटना १६ जून रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास आझाद कॉलेज परिसरात घडली. सुफियान पठाण व त्याचा एक साथीदार अशी चाकूहल्ला करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुझाईद वाहीद कुरेशी (२४, रा. इस्ला हाऊसिंग सोसायटी, हसुल सावंगी) याने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हा त्याची बहीण रश्मीन फातेमा कुरेशी (१९) हिच्यासोबत बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आजाद कॉलेजमध्ये गेला होता. प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ सुरू असल्याने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोघे ज्युनियर कॉलेजच्या
गार्डनमध्ये बसले होते.

गार्डनमध्ये बसलेल्या भावंडांजवळ दोन युवक आले. तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मुझाईदने आपण बहिण-भाऊ असल्याचे सांगितले. तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली, त्यातील एकाने आपले नाव सुफियान पठाण सांगितले. तेंव्हा फिर्यादीने, त्याला आपका हमारे पास क्या काम है, अशी विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या सुफियान पठाण याने फिर्यादीला रुक तेरे को बतात असे म्हणून त्याने कोणाला तरी फोन लावला व फिर्यादी व त्याच्या बहिणीला शिवीगाळ करु लागला. शिवीगाळ केल्याचा मुझाईदने त्याला जाब विचारताच त्याने चाकूने थेट छातीवर वार केला.

गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पाठीमागून पकडून वार; गळ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

सुफियानच्या साथीदाराने मुझाईदला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तेव्हा मुझाईदला पकडलेल्या साथीदारोन त्याच्या गळ्यावर वार कर असे म्हणाला. त्यानासर सुफियान याने मुझाईदच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुझाईदने मान खाली घेतल्याने वार दाढीच्या भागावर लागला आणि मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी रश्मीनला धक्का देत तेथून पळ काढला. चहिणीसमोर घडलेल्या या प्रकारामुळे ती ही घाबरून गेली.

घाटीत उपचार, गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुझाईदला तेथील दोन युवकांनी मदत केली. त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांनी त्याला दाखल करून घेतले नाही. तेव्हा मुझाईदला त्याच्या भावांनी घाटीत दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष खरात करत आहेत.

Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद

Web Title: Youth attacked with a knife in a life threatening assault while out for his sisters college admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Attack
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.