Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात २१ जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) परीक्षेसाठी १७,७३४ विद्यार्थी सज्ज आहेत. पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर ५० केंद्रांवर ड्रोनचा पहारा आणि कडक बायोमेट्रिक तपासणी केली जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 04:08 PM
'नीट' परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त

'नीट' परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त

Follow Us
Follow Us:
  • ‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त
  • १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा
  • कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार
छत्रपती संभाजीनगर: शहर व जिल्ह्यात २१ जून रोजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत झालेल्या पेपर लीक प्रकरणामुळे यंदा प्रशासनाने सावध पावले उचलले असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात ४७ तर ग्रामीण भागातील ३ अशा ५० केंद्रांवर ही परीक्षा होईल. यावर्षी प्रथमच कोचिंग क्लासेसने विद्याथ्यांना दिलेल्या जे पेपर्सचीही पडताळणी प्रशासनामार्फत केली जाणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नीट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. जी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात परीक्षेचे नियोजन आणि सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतरजिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषदेत माहिती दिली. जिल्हाधिकारी म्हणाले, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन, पोलिस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी पूर्ण तयारी केली आहे.

NEET Exam Stress: नीट परीक्षेच्या तणावातून ‘या’ राज्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; एकदा वाचाच धक्कादायक रिपोर्ट

१७ हजार ७३४ विद्यार्थी देणार नीट परीक्षा

जिल्ह्यात एकूण ५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील १७ हजार ७३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षा दुपारी २ ते ५.१५ वाजता होणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, पोलीस बंदोबस्त अधिकारी आणि परीक्षा कार्यरत दंडाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राच्या परिसरात सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोनद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथे महानगर पालिकेच्या विशेष बसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तर दिव्यांग परीक्षार्थीसाठी केंद्रावर मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी आणि उपस्थिती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. १. ३० नंतर केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी ५. १५ पर्यंत परीक्षेची वेळ असेल तर दिव्यांगांसाठी ६. १५ अशी वेळ असेल. परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत २० जून रोजी प्रशासकीय पूर्वतयारी घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नियुक्त अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला आपापसात समन्वय ठेवून परीक्षा शांततेत होणार आहे.

NEET UG Re-Exam: नीट परीक्षेसाठी भारतात Telegram बॅन; पण बंदीनंतरही ॲप कसं चालतंय? सायबर तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

Web Title: Neet exam in chhatrapati sambhajinagar strict security drone surveillance at 50 centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • NEET

संबंधित बातम्या

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
1

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
2

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
4

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.