Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २८ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MahaTET) २९,४१४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी परीक्षा केंद्रांवर झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 01:42 PM
TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
Follow Us
Follow Us:
  • ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट!
  • संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
  • असे आहे वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्हा समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विनय गौडा हे होते. यावेळी झेडपी सीईओ मिन्नू पी. एम., डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, जयश्री चव्हाण, मनपा शिक्षण विभागाचे ननावरे उपस्थित होते.

बैठकीत टीईटी परीक्षेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तयारी, गोपनीय परीक्षा साहित्याची सुरक्षित वाहतूक, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, भरारी पथकांची स्थापना, अखंडित वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न

परीक्षा पारदर्शक, गैरप्रकारमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून टीईटी परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

असे आहे वेळापत्रक

परीक्षेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 सकाळी 10.30 ते 1 या वेळेत तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे.

हे भावी शिक्षक देतील आता टीईटी परीक्षा

यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी जिल्ह्यात पेपर क्रमांक १ (प्राथमिक) साठी १३,२३३ तर पेपर क्रमांक २ (उच्च प्राथमिक) साठी १६,१८१ उमेदवारांनी नोंदणी केली असून एकूण २९,४१४ उमेदवार परीक्षा देणार आहेत. माध्यमनिहाय उमेदवारांमध्ये हिंदी माध्यमाचे ९,२३५ मराठी माध्यमाचे ८,७९१, उर्दू माध्यमाचे १,७५५ आणि इंग्रजी माध्यमाचे ८६८ उमेदवारांचा समावेश आहे.

NEET UG Re Exam पूर्वी अलर्ट, जुन्या Admit Card वरून मिळणार नाही प्रवेश, NTA रिमाइंडरमध्ये नक्की काय?

Web Title: Administration on alert for tet following the neet fiasco over 29000 aspiring teachers to take the exam in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Exam
  • TET Exam

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.