Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके

छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठांमधील अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेने ५ विशेष गस्ती पथके तयार केली असून पैठण गेट, गुलमंडीसह १२ प्रमुख मार्गांवर आता दिवसभर खडा पहारा दिला जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 02:05 PM
छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! (Photo Credit- AI)

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन!
  • शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके
  • वाचा संपूर्ण बातमी!
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी) : शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने कारवाईसोबत सातत्यपूर्ण देखरेखीची नवी रणनीती आखली आहे. पहिल्या टप्यात शहरातील १२ प्रमुख मार्गावर सकाळपासून रात्रीपर्यंत गस्त घालण्यासाठी पाच विशेष पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकाला स्वतंत्र वाहन देण्यात येणार असून, अतिरिक्त २० कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर ही व्यवस्था कार्यान्वित होईल.

महापालिकेकडून नियमित अतिक्रमण हटाव कारवाई होत असली तरी पथक परतल्यानंतर काही तासांतच अतिक्रमणे पुन्हा होत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे बाजारपेठांतील वाहतूक कोंडी वाढत असून पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून निवडक मार्गावर दिवसभर गस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट, शहागंज, सिटी चौक, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, गजानन महाराज मंदिर परिसर आदी भागांत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत.

दुकानांसमोर ओटे, वाहनांचे पार्किंग आणि हातगाड्यांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी कमी होत असून, गदींच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावतो. प्रत्येक गस्ती पथकात पाच कर्मचारी असतील. अतिक्रमण होताच तत्काळ कारवाई करून ते पुन्हा उभे राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित पथकावर असेल.

८ वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा होत असल्याने सातत्यपूर्ण गस्तीची व्यवस्था उभारली जात आहे. अतिरिक्त कर्मचारी मिळाल्यानंतर ही यंत्रणा तातडीने सुरू करण्यात येईल. – संतोष वाहुळे, नियंत्रण अधिकारी, अतिक्रमण हटाव विभाग, महापालिका

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

२० कर्मचाऱ्यांनंतर यंत्रणा होणार कार्यान्वित

हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील अन्य प्रमुख मार्गांवरही टप्प्याटप्याने ही व्यवस्था लागू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गस्ती पथकांसाठी २० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच पथके कार्यरत केली जातील. गस्ती पथकांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २० कर्मचारी मिळाल्यानंतर पाचही पथके प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील. प्रत्येक पथकाला स्वतंत्र वाहन देऊन सकाळपासून रात्रीपर्यंत संबंधित मार्गावर सातत्याने गस्त ठेवली जाणार आहे.

‘या’ १२ मार्गांवर राहणार विशेष नजर

पैठण गेट – गुलमंडी
शहागंज पोस्ट ऑफिस परिसर
महात्मा गांधी पुतळा चेलीपूरा
गजानन महाराज मंदिर परिसर
मुकुंदवाडी परिसर
रोशन गेट कटकट गेट
चिश्तिया चौक बळीराम पाटील विद्यालय –
-क्रांती चौक रेल्वे स्टेशन
औरंगपुरा – चंपा चौक
रेल्वे स्टेशन पैठण गेट –
जटवाडा रोड
रेल्वे स्टेशन – हसूल रोड

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

Web Title: Municipal corporation appoints 5 special squads to patrol 12 major roads for encroachment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत
1

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…
2

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
3

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
4

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.