Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती

पैठण शहरातील ७० हजार लोकसंख्येसाठी केवळ २ घंटागाड्या सुरू असून स्वच्छता यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून नगराध्यक्षांनी लवकरच १५ नव्या घंटागाड्या आणण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 04:40 PM
ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या

Follow Us
Follow Us:

 

  • ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य!
  • ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या
  • पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती
पैठण (वा.): शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून तब्बल ७० हजारांच्या जवळपास लोकसंख्या आणि १२ प्रभागांच्या शहराची स्वच्छता सध्या केवळ दोन घंटागाड्यांवर अवलंबून आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर संक्रमणजन्य रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पैठण शहरातील दारूसलाम, परदेशीपुरा, सादात मोहल्ला, काहारवाडा, इंदिरानगर, नेहरू चौक, जोहरीवाडा, पापानगर, कावसन, नारळा, गंगलवाडी आदी भागांमध्ये सध्या कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात शिवसेनेची सत्ता असताना स्वच्छतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या खाजगी ठेकेदाराने काम सोडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

परिणामी अनेक भागांमध्ये वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराला दहा घंटागाड्या उपलब्ध झाल्या होत्या. मात्र सध्या त्यापैकी तब्बल आठ घंटागाड्या नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ दोन गाड्यांवर संपूर्ण शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असल्याने स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे.

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ; महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा

नगरपालिकेत सफाई कामगारांचीही मोठी कमतरता भासत आहे. अनेक कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांना इतर कामांवर ठेवण्यात आल्याने प्रत्यक्ष स्वच्छता कामासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, असा इशारा आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

दरम्यान, नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेशा निधीचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहराच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लवकरच नवीन घंटागाड्या सेवेत नगराध्यक्ष

पैठण शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात लवकरच १५ नवीन घंटागाड्या दाखल होणार आहेत. मात्र, विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या घंटागाड्यांच्या प्राप्ती प्रक्रियेला विलंब झाला आहे दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पयांयी व्यवस्था म्हणून पाच ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन सुरू केले आहे. शहरातील घनकचरा उचलणे, कचऱ्याचे ढीग हटविणे आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर यांनी स्पष्ट केले.

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Web Title: Paithan city garbage crisis only two ghantagadi for 70 thousand population

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Garbage Issue
  • Paithan

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
1

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
2

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील
3

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.