Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई! ७३ मालमत्तांची झाडाझडती, १७ सील; एकाच दिवसात ९२.७० लाखांची कर वसुली

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने २० जून रोजी मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबवून १७ मालमत्ता सील केल्या आणि एकाच दिवसात ९२ लाख ७० हजार रुपयांचा कर वसूल केला. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 01:02 PM
संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई!

संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई!

Follow Us
Follow Us:
  • संभाजीनगर मनपाची शहरभर धडक कारवाई!
  • ७३ मालमत्तांची झाडाझडती, १७ सील
  • एकाच दिवसात ९२.७० लाखांची कर वसुली
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात महानगरपालिकेने शनिवारी दि.२० जून रोजी शहरभर विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. सर्व १० झोनमध्ये एकाचवेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ७३ थकबाकीदार मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ मालमत्ता सील करण्यात आल्या, तर विविध थकबाकीदारांकडून एकूण ९२ लाख ७० हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी सर्व झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून वसुली पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.

थकबाकीदारांना कारवाई टाळण्याचे मनपाचे आवाहन

त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागांत पथकांनी भेटी देऊन थकबाकीदारांवर कारवाई केली. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली, तर अनेकांनी तत्काळ थकबाकी भरून पुढील कारवाई टाळली. महापालिका प्रशासनाने पुढील काळातही अशाच स्वरूपाच्या मोहिमा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी तातडीने कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

झोन ८ मध्ये सर्वाधिक वसुली

या मोहिमेत झोन ८ ने सर्वाधिक ३६.७५ लाख रुपयांची वसुली केली, झोन ५ मध्ये १९.०९ लाख, झोन ६ मध्ये १३.६५ लाख आणि झोन १ मध्ये १३.६० लाख रुपयांचा ३ कर जमा झाला. मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने वसुलीला गती मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. झोननिहाय कारवाईत झोन १ मध्ये एक, झोन २ मध्ये एक, झोन ३ मध्ये दोन, झोन ४ मध्ये तीन, झोन ५ मध्ये सहा, झोन ६ मध्ये तीन, झोन ७ मध्ये तीन, झोन ८ मध्ये एक आणि झोन १० मध्ये तीन मालमत्ता सील करण्यात आल्या. झोन ३ मधील दोन मालमत्तांवर तब्बल २५.५४ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले.

मोठ्या थकबाकीदारांवर प्रशासनाचा फोकस

महापालिकेने चालू आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक झोनमध्ये १५ ते २० प्रमुख थकबाकीदारांची निवड करून त्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे. थकबाकी कायम ठेवल्यास सीलसह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

School Uniform: गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत

Web Title: Sambhajinagar municipal corporation launches a massive city wide crackdown 73 properties inspected 17 sealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.