गणवेशाची होणार अचानक तपासणी! गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास पुरवठादारांवर कारवाईचे संकेत
काही ठिकाणी कमी प्रतीचे कापड वापरल्याने गणवेश अल्पावधीत फाटणे, रंग उडणे अथवा शिवणकाम निकृष्ट असल्याच्या बाबी निदर्शनास आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतर्गत शिक्षण विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या अंगावरील गणवेशाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आवश्यकतेनुसार कापडाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचीही तयारी करण्यात आली आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या पुरवठादारांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह भविष्यातील निविदा प्रक्रियेतून वगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून विद्याथ्यांच्या शैक्षणिक सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना त्याचा दर्जेदार लाभ विद्याथ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विद्याथ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
विद्यार्थ्यांना गणवेशासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून योजना राबविली जाते. बहुतांश निधी वितरित झाला तर उर्वरित निधी लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. निधीचा योग्य वापर व दर्जेदार गणवेश पुरवठ्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.
८८ विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाचा निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाचा पुरवठा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सिल्लोड तालुक्यात अचानक तपासण्या घेऊन संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली जाणार आहे. शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक






