Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Municipal Corporation Revenue: संभाजीनगर मनपाच्या तिजोरीत ४५० कोटींचा खडखडाट! वसुलीचा नवा विक्रम

मालमत्ता कर विभागातून २३५ कोटी, मालमत्ता विभागातून १३.१० कोटी आणि नगररचना विभागात गुंठेवारीसह बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याबद्दल तब्बल २०१ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 02:58 PM
Sambhajinagar Municipal Corporation Revenue (Photo Credit - X)

Sambhajinagar Municipal Corporation Revenue (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगर मनपाच्या तिजोरीत ४५० कोटींचा खडखडाट!
  • वसुलीचा नवा विक्रम
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असलातरी स्थानिक नेत्यांनी पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप न केल्याने कधी नव्हे ते महापालिकेची तिजोरी गळ्यापर्यंत भरली आहे. २०२५ २६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर, मालमत्ता आणि नगररचना विभाग या तिन्ही विभागातून तब्बल ४५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मालमत्ता कर विभागातून २३५ कोटी, मालमत्ता विभागातून १३.१० कोटी आणि नगररचना विभागात गुंठेवारीसह बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याबद्दल तब्बल २०१ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच कराच्या वसूलीकडे विशेष लक्ष देण्यात आले. वर्षभरात उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविल्या. मालमत्ता कर वसुलीसाठी मैत्र कक्ष सुरू केला. वसूली कर्मचाऱ्यांना टॅब देऊन त्यांच्यावर वसूलीची जबाबदारी सोपवली. झोन कार्यालयातील वसूली अधिकाऱ्यांना घरोघरी पाठवून कर वसूली केली. मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली.

Chhatrapati Sambhajinagar: निधी वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ; ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कोषागारात ५५० बिलांचा निपटारा!

मालमत्ता विभागाने केले वसूल १३.१० कोटी

महापालिकेच्या मालमत्ता विभागानेही यावर्षी वसूलीचा विक्रम केला. शहरातील ४८८ गाळ्याचे भाडे, हॉलचे भाडे आणि लीजवर दिलेल्या पडिक जमीनीच्या भाडेपोटी १३.१० कोटी वसूल झाले. मालमत्ता विभागाच्या उपायुक्त अपर्णा थेटे आणि सहायक आयुक्त संजय चामले यांनी यावर्षी मालमत्ताच्या गाळ्यांचे भाडे कराराचे नुतनीकरण करून रेडीरेकनर दराने भाडे आकारणी केली. त्याचा सर्वाधिक फायदा झाला. मागील वर्षी मालमत्ता विभागाला ११ कोटी रुपयाचे उत्पन्न झाले होते. यावर्षी १३.१० कोटीचे उत्पन्न झाले आहे.

नगररचना विभागाची २०१ कोटींची वसुली

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या नगररचना विभागाने यावर्षी विक्रमी वसूली करीत २०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, नगररचना उपसंचालक मनोज गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनगर रचनाकार कौस्तुभ भावे यांच्यासह उपअभियंता यांनी गुंठेवारी विभागाच्या संचिकांना मान्यता दिली. वर्षभरात गुंठेवारीच्या ९३०० संचिका मंजूर केल्यामुळे त्यातून ७७ कोटी रुपये मिळाले. गुंठेवारीसाठी दर कमी करण्यात आले. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा झाला आहे. त्यामुळेच मनपाच्या तिजोरीत ७७ कोटी रुपये जमा झाले. त्यासोबतच यावर्षी १३१४ बांधकाम परवानगी देण्यात आल्या आहेत. रजिष्ट्री केली जाणार नसल्याचा नियम लागू झाल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी राहिलेली रक्कम जमा केली. त्यामुळे मनपाला १२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोलचा तुटवडा संपला, पण रिक्षाचालकांचे हाल कायम; एलपीजीचा तिढा अद्याप सुटेना!

Web Title: Sambhajinagar municipal corporations coffers bare 450 crore shortfall a new record in recovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Revenue Department

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या नो-नेटवर्क भागाला महिनाभरात पाणी; जलकुंभांच्या चाचण्या सुरू
4

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या नो-नेटवर्क भागाला महिनाभरात पाणी; जलकुंभांच्या चाचण्या सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.