Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोंदू बाबा प्रकरणावर संजय शिरसाट कडाडले! फोटोसाठी आता बुरखा घालून फिरावे लागेल का? तर अवकाळीग्रस्तांना मदतीचे आश्वासन

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणावरून विरोधकांवर टीका केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 03:14 PM
भोंदू बाबा प्रकरणावर संजय शिरसाट कडाडले!

भोंदू बाबा प्रकरणावर संजय शिरसाट कडाडले!

Follow Us
Follow Us:

 

  • भोंदू बाबा प्रकरणावर संजय शिरसाट कडाडले!
  • फोटोसाठी आता बुरखा घालून फिरावे लागेल का?
  • तर अवकाळीग्रस्तांना मदतीचे आश्वासन
Sanjay Shirsat on Ashok Kharat: अनेकजण फोटो काढत असतात. ते ज्याला आपला आदर्श मानतात, त्यांच्यासोबत जनता फोटो काढते. मात्र समोरची व्यक्ती कशी आहे, हे लोकप्रतिनिधीला माहित नसतं. आता फोटो काढण्याआधी त्याची माहिती घेत बसायचे, इतकेच काम आमच्याकडे उरले आहे का ? विरोधकांचे कुणासोबत फोटो आहे, ते आम्ही काढावे का?, फोटोमुळे राजकारण सोडावे लागले तर यापुढे आम्हाला बुरखा घालून फिरावे लागेल, असे रोकठोक मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

अनेक वर्षे त्याला तुरुंगात काढावे लागतील

शनिवारी (दि.२१) पालकमंत्री शिरसाट यांनी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सध्या नाशिक येथील कथित ज्योतिष अशोक खरात याच्यासोबत लोकप्रतिनिधींचे असलेले फोटो व्हायरल होत असून, याची चर्चा सुरु आहे. यावर मंत्री शिरसाट यांनी आपले मत व्यक्त केले. शिरसाट म्हणाले, राजकारणात अनेकांशी लोकप्रतिनिधींचा संपर्क येत असतो. येणाऱ्या माणसाच्या मनात काय आहे, तो काय उद्योग करतो, हे माहित नसते. मात्र हे माहित असूनही कोणी साथ देत असले तर तो गुन्हा ठरतो. त्याची चौकशी झाली पाहिजे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निचपणाचा कळस दिसतो. धर्माच्या नावावर असा प्रकार महाराष्ट्राला कलंक आहे. यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. त्या भोंदूबाबासोबत अनेक मोठ्या नेत्यांचे फोटो आहेत. चुकीच्या माणसाला भेटल्याचा पश्चाताप नंतर होतो. आता खरातचा रामराहीम झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षे त्याला तुरुंगात काढावे लागतील. सरकारने याची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप

एकनाथ शिंदे समज देतील

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडीत झालेल्या घटनांची माहिती पक्षाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कानावर पोहोचली आहे. कोणी काय केले, याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे ते योग्य त्या व्यक्तीला योग्य ती समज समज ते देतील, अशी खात्री असल्याचेही मंत्री शिरसाट म्हणाले.

अवकाळीची नुकसान भरपाई लवकरच

निसर्गापुढे माणूस हतबल असतो. मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हतबल झालेला असला तरी शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. लवकरच या अवकाळीचा पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. पूर्वी प्रचंड पाऊस झाला, तेव्हा सरकारने २० हजार कोटींची मदत केली होती. यंदाही सरकारने पंचनामे सुरु केले असल्याचे मंत्री म्हणाले.

घरकुलात बोगसगिरी असेल तर कारवाई

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी घरकुल योजनेच्या निधी वितरणात बोगसगिरी झाल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, माझ्या खात्यातर्फे म्हणजेच सामाजिक न्याय विभागातर्फे रमाई आवास योजनेला निधी दिला जातो. त्यापुढील प्रक्रिया करण्याचे काम महापालिका आणि जिल्हा परिषदेने करायचे असते. आम्ही फक्त निधी देतो, मात्र यात पुढे निधी वितरित करताना कोणाची फसवणूक झाली असेल तर यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले.

Nashik News : पाथर्डी शिवारात भोंदू बाबा खरातची कोट्यवधीची बेनामी मालमत्ता; मूळ मालकांना धमकावल्याच्या तक्रारी

Web Title: Sanjay shirsat on ashok kharat photo controversy news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.