Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sillod: अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक; रात्री १० वाजता रस्ता रोखत रोखली वाळूची वाहतूक

सिल्लोडमधील पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक. रस्ता रोको करत वाळू माफियांना रोखले; महसूल प्रशासनावर गंभीर आरोप.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 04:15 PM
अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक

अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक

Follow Us
Follow Us:

 

  • अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक
  • रात्री १० वाजता रस्ता रोखत रोखली वाळूची वाहतूक
सिल्लोड, (वा.): तालुक्यातील बोरगाव कासारी परिसरात पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून त्रस्त गावकऱ्यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता वाळू माफीयांच्या विरोधात रस्त्यावर येत त्यांची वाट अडवून धरली. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बोरगाव कासारी, पिंपळगाव पेठ आणि गणेशवाडी, तांडाबाजार या परिसरातील अज्ञात ट्रॅक्टर चालकांकडून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे. या बेकायदेशीर कारभारामुळे पूर्णा नदीची अक्षरशः चाळणी होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व हायवा वाहनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असल्याने गावात धुळीचे प्रचंड प्रदूषण निर्माण झाले आहे. ही धूळ घरांमध्ये साचत आहे व
यामुळे श्वसनाचे त्रास तसेच रात्रभर सुरू असलेल्या वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ग्रामस्थांचे जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ बाबासाहेब मेटे यांनी दिला. या अवैध वाळू उपशाची माहिती महसूल प्रशासनास असून याकडे जाणून-बुजून डोळेझाक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तहसीलदारांनी रात्री मध्यरात्री नदीपात्रात येऊन व्हिडिओ काढत सोशल मीडियावर वायरल करण्यापेक्षा या रस्त्यावर होणारी बेसुमार वाळू वाहतूक रोखावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संभाजीनगर महापालिका मालामाल! प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांच्या उत्पन्नात मोठी वाढ; वर्षभरात ४.८५ कोटींची कमाई

या आंदोलनात कचरू वाढेकर, राजू गोराडे, संजय गोराडे, कांताबाई जाधव, राधाबाई मेटे, कसाबाई जाधव, बाबासाहेब मेटे, विठ्ठल गोराडे, रुख्मणबाई वाढेकर, नानुबाई वाढेकर, सोनु वाढेकर, नारायण मोठे, गयाबाई मोठे, पांडुरंग मेटे, कडुबा मेटे, पदमाबाई गोराडे, रुख्मणबाई गोराडे, काकासाहेब वाढेकर, गीताबाई वाढेकर, रंजना जाधव आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १० वाजता संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी सरपंच पती कौतिक जाधव यांनी महसूल व पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत, हप्तेखोरीमुळेच हा अवैध वाळू उपसा बिनधास्त सुरू आहे, असा संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

रस्त्यावरील वाळूमुळे अपघाताचा धोका

बोरगाव कासारी, पिंपळगाव पेठ आणि गणेशवाडी, तांडाबाजार या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू वाहतुकीच्या वाहनामधून वाळू सांडलेली असल्यामुळे दुचाकी स्वरांचे अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रस्त्यावर सोडलेल्या वाळूमुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

Web Title: Sillod borgaon kasari villagers protest against illegal sand mining purna river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • sillod news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.