Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख ४ हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ लाख ४ हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 01:17 PM
मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख ४ हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ लाख ४ हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर ४३० अर्ज नामंजूर करण्यात आले असून १६० अर्ज प्रलंबित आहेत. यात बीड जिल्हा अव्वल आहे तर संभाजीनगरात २४ हजार ४३१ कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

मराठा कुणबी आरक्षणप्रश्नी नेमण्यात आलेल्या न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने मंगळवारी मराठवाड्‌यातील मराठा कुणबी ही प्रमाणपत्र वितरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी आढावा घेतला. आढावा बैठक झाली. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी., अप्पर विभागीय आयुक्त मंजुष मिसकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मराठवाड्यात आतापर्यंत वितरित मराठा कुणबी प्रमाणपत्रांची माहिती देण्यात आली. त्यानुसार, बीड जिल्हयात सर्वाधिक २ लाख ४ हजार २५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ लाख ३ हजार ९८८ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, केवळ २७ अर्ज प्रलंबित आहेत. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जाची संख्या जास्त आहे. त्यांना दोन आठवड्यात प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा जी. सी. यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हे सुद्धा वाचा : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

मराठवाड्यात बीड जिल्हा वाटपात ठरला अव्वल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ हजार ४९५ अजर्जापैकी २४ हजार ४३१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून एकही अर्ज प्रलंबित नाही. जालना येथे ५३, परभणी येथे ३८ आणि धाराशिव येथे ४२ अर्ज प्रलंबित आहेत. धाराशिवमध्ये २४५ अर्ज नामंजूर झाले आहेत. दरम्यान, १ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत मराठवाड्यात एकूण ६५ हजार ३० कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये बीड (४०,८६५) जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असून त्यानंतर परभणी (५,५७८), धाराशिव (५,०१९), छत्रपती संभाजीनगर (४,७७७) आणि हिंगोली (४,१८९) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट

Web Title: The distribution of kunbi caste certificates is proceeding rapidly in marathwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • maratha aarkshan
  • Maratha Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.