
नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Photo Credit - X)
राजकीय ‘वजन’ दाखवण्याचे काम
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच आमदारांनी तालुक्यात वर्चस्व राहावे यासाठी ‘जुळवाजुळव’ सुरु केली होती. आधी महायुती, महाआघाडी म्हणून निवडणुकीत उतरण्याची भाषा करणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ऐनवेळी घुमजाव करीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेशित केले. शेवटच्या दिवशी अशी भूमिका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी दाखल करीत त्यांचे राजकीय ‘वजन’ दाखवण्याचे काम केले. मंगळवारी दाखल झालेल्या उमेदवारीच्या अर्जाची छाननी केली गेली.
भाजप नेतेही लागले कामाला
जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढवून एक नवरचा पक्ष म्हणून नावरुपाला आणण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने मंत्री अतुल सावे यांच्यासह सर्व नेते कामाला लागले आहेत, अशातच आमदार संजय केगेकर यांच्यासारखी मुलूख मैदानी तोफ म्हणून त्यांना पुढे केले जाणार आहे. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यारहठी देखील नगर परिषद निवडणूक पक्षासाठी महत्वाची ठरणार आहे. जिल्यात प्रशांत बंब आणि शहनात अतुल सावे हे दोघे आमदार होते, या दोन्ही नेत्यांवर जिल्ह्यात ‘वजन’ वापरून पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आ. सत्तार यांच्यामुळे सिल्लोड केंद्रस्थानी..
सिल्लोड नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १७अजपैिकी ५ अर्ज बाद होवून १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अजपिकी नगरसेवक पदासाठी ११८ उमेदवार पात्र ठरले आहेत. नगरसेवकांच्या २८ जागांसाठी २२९ अर्ज दाखल झाले होते. यापैकी १११ अर्ज बाद झाले असून २८ जागांसाठी ११८ उमेदवार रिंगणात आहेत. मागील वीस वर्षांपासून नगर परिषदेवर आमदार अब्दुल सतार गटाचा ताबा होता. राज्यासह जिल्ह्यातील सत्तेचे समीकरण बदल्यामुळे यंदा नगराध्यक्षपदाची खूचीं ताब्यात ठेवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उबाठा सेना गटात प्रवेश करणारे सुरेश बनकर यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करुन सतार याच्यासमोर पंच उभा केला आहे. तर दुसरीकडे खा. डॉ. कल्याण काळे यांनी देखील सिल्लोड ताब्यात मिळवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लावले आहेत. अशातच सिल्लोड निवडणूक जिल्ह्यात केंद्रस्थानी आली आहे.
वैजापूरसाठी प्रतिष्ठा पणाला…
वैजापूर नगर परिषदेवर निविर्वाद वर्चस्व गाजवणाऱ्या दिनेश परदेशी दाम्पत्याने विधानसभा निवडणुकीच्या तोडावर उबाठा सेनेत प्रवेश करुन शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांच्या विरोधात निवडणूक लढवून अडवणी उभ्या केल्या होत्या. तेच परदेशी पुन्हा भाजपमध्ये परतले असून आता त्यांनी नगराध्यक्षपदी आपलाच दावा करुन उमदेवारी दाखल केली आहे. असे असले तरी तालुक्यात ‘मैत्रीपूर्ण’ लढत होण्याचे बोलले जात असले तरी या निवडणुकीत वचपा काढण्यासाठी रणनिती आखली जात आहे. या खेळात आमदार की नगराध्यक्ष बाजी मारतात हे पाहावे लागणार आहे.
पुन्हा एकदा भुमरेशाही
शिवसेनेत ‘खिंडार’ पहल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली होती, त्यावेळी युती असल्याने एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या ताब्यातील खासदारकी संदीपान भुमरे यांनी हिसकावून घेत पुन्हा एकदा भगवा फडकावला होता.
यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र विलास भुमरे याना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खासदारांनी सर्वच विधानसभेच्या जागा प्रतिष्ठेच्या करुन पूर्वीपेक्षा एक अधिक जागा शिंदे गटाकडे खेचून आगली. यात कन्नड विधानसभेची जागा ही उबाठा गटाकडे होती,
त्या जागेवर रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना निवडून आणत पक्षाची ताकद दाखवून दिली. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या खा. भुमरे यांना पुन्हा एकदा नगर परिषेदेवर ‘भुमरेशाही’ असल्याचे दाखवून देण्यासाठी राजकीय खेळी खेळावी लागणार आहे.