Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathwada Sugar Industry: साखरेचा गोडवा वाढला! मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार; पाहा तुमच्या विभागातील गाळपाची स्थिती

ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 03:18 PM
साखरेचा गोडवा वाढला! मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार (Photo Credit- X)

साखरेचा गोडवा वाढला! मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • साखरेचा गोडवा वाढला!
  • मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार
  • पाहा तुमच्या विभागातील गाळपाची स्थिती
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): यंदाच्या गाळप हंगामात मराठवाड्यातील साखर उद्योगाने उल्लेखनीय कामगिरी करत साखर उत्पादनाचा दोन कोटी टनांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनाच्या वेगामुळे संपूर्ण प्रदेशातील साखर कारखान्यांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे सरासरी साखर उतारा सुमारे ९.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे. गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही काही कारखाने अजूनही गाळप करत असल्याने उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

साखरेमुळे उत्पादनाचा आकडा दोन कोटी टनांच्या पुढे

प्रादेशिक (साखर) सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप पूर्ण केले आहे. या गाळपातून तयार झालेल्या साखरेमुळे उत्पादनाचा आकडा दोन कोटी टनांच्या पुढे गेला आहे. हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज ज्या प्रमाणात व्यक्त करण्यात आला होता, त्या तुलनेत मराठवाड्यातील उत्पादनाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. वाढते तापमान आणि उसाची उपलब्धता कमी होत चालल्यामुळे काही भागात गाळप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर उद्योगाच्या प्रगतीमुळे शेतकरी, ऊसतोड कामगार संबंधित उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामात झालेल्या चांगल्या उत्पादनामुळे साखर उद्योगाला आर्थिक बळ मिळणार आहे.

संभाजीनगर विभाग

  • ऊस गाळप १,२०,४६,२९८ टन
  • साखर उत्पादन : १,०९, ६९, ५४५ विवंटल
  • उतारा : ९.२२%

नांदेड विभाग

  • ऊस गाळप १,२५.६६,६६० टन
  • साखर उत्पादन ११,६८,९७२ क्विंटल
  • उतारा : ९.४३%
संभाजीनगर आर्थिक प्रगतीपथावर! जिल्हा उत्पन्नात 54 टक्क्यांची भरघोस वाढ; ‘महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26’ जाहीर

कोल्हापूर विभाग

  • ऊस गाळप २,७०,४५,४८४ टन
  • साखर उत्पादन २३,९९,०७४० क्विंटल
  • उतारा: ११.०२%

पुणे विभाग

  • ऊस गाळप २,२९,६७,९५३ टन
  • साखर उत्पादन २३.२३,९८४० क्विंटल
  • उतारा : ९.८५%

सोलापूर विभाग

  • ऊस गाळप २,२०,४५,४८२ टन
  • साखर उत्पादन: १८,५५,५९६६ क्विटल
  • उतारा : ८.६%

अहिल्यानगर विभाग

  • ऊस गाळप १.२५.९९,६६६ टन
  • साखर उत्पादन क्विंटल ११,३३,६६,३३२
  • उतारा : ९.०६%

नागपूर विभाग

  • ऊस गाळप : १९,५९,१९४ टन
  • साखर उत्पादन: ८७,५५५ क्विंटल
  • उतारा : ४.४५%
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

Web Title: The sweetness of sugar rises marathwada crosses the 20 million ton mark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada
  • Sugar Mill

संबंधित बातम्या

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
1

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.