छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळली, दोन महिलांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाली आहेत. मृत महिला उद्यानातील कर्मचारी होत्या. स्वाती खैरनाथ (वय ३५, लासलगाव) आणि रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक एन ११ हडको) अशी या महिलांची नावं आहेत.
Rajasthan News : राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना; बनास नदीत बुडून ८ तरुणांचा मृत्यू
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहाच्या सुमारास संभाजीनगर शहरात जोरदार वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसात सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग नागरिकांवर कोसळला. त्यात उद्यानाच्या दोन महिला कर्मचारी होत्या, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रवेशद्वाराचं काही वर्षांपूर्वी नुतनीकरण झालं होतं.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या नुतनीकरणाचं काम काही वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र, इतक्या लवकर त्याचा भाग कोसळला कस असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता या घटनेची जबाबदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाते का ते पाहावं लागणार आहे.
घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. जखमींना तातडीन नजीकच्या रुग्णालयात उपयारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.