Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Black Magic News: मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा…; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय?

Black Magic: एका शाळेसमोर हा धक्कादायक प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात जादूटोणासदृश वस्तू आणि पूजा केलेले मडके ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 05, 2026 | 02:40 PM
मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा...; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय? (Photo Credit - X)

मटक्यावर मृत्यूचा संदेश अन् भुताटकी आणि जादूटोणा...; स्थानिक रहिवाशांमध्ये पसरली भीती; नेमकं प्रकरण काय? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बजाजनगरात एका शाळेजवळ आढळली वस्तू
  • स्थानिक रहिवशांमध्ये पसरली भीती
  • करणी अन् भुताटकीच्या संशयाने नागरिकांत खळबळ
Chhatrapati Sambajinagar Black Magic News: सडा, रांगोळी टाकून एका मटक्यावर मृत्यूचा संदेश देणारा मजकूर लिहून अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू वाहून पूजा करून करणी, भानामती, भुताटकी आणि जादूटोणा केल्यासारखा प्रकार उघडकीस आला. यामुळे बजाजनगर परिसरात रविवारी खळबळ उडाली. दरम्यान, अशा घटना, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

नेमकी घटना काय?

वाळूज परिसरातील बजाजनगर- वडगाव (को) रोडवरील एका शाळेसमोर हा धक्कादायक प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यात जादूटोणासदृश वस्तू आणि पूजा केलेले मडके ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले. हा प्रकार सोशल मीडिया रील बनवण्यासाठी किंवा खोडसाळपणा म्हणून केला असावा, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. ही बाब समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत भानामती आणि भुताटकीला साजेशी संशयास्पद वस्तू ही तिथून हटवण्यात आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

असा होता ‘त्या’ मटक्यावरील मजकूर

याबाबत शाळेचे संचालक म्हणाले की, शाळेच्या गेटसमोर हा प्रकार सकाळी उघडकीस आला. मटक्याची पूजा करून तेथे अगरबत्ती, लिंबू, मीठ, कुंकू टाकलेले होते. ओलांडून गेला तर मृत्यू होईल, पाठीमागेवळून पाहिले तर मरून जाशील. भूत प्रेत येथेच्छ ! आसा मजकूर त्यावर लिहिलेला होता. नागरिकांत दहशत पसरली आहे.

अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका, जागरूक राहा. करणी, जादूटोणा, भानामती आणि भुताटकी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. हा केवळ खोडसाळपणा असू शकतो. अंधश्रद्धेपेक्षा आपल्या सुरक्षेला महत्त्व द्या, असे आवाहन रोहित खैरे, अशोक लगड, पंडित नवले, किशोर उमाळे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल खंडागळे यांनी केले.

हे देखील वाचा: Crime News: मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण, तर अवघ्या दोन तासात पोलिसांकडून सुटका

Web Title: A fearful atmosphere was created in front of a school by placing objects resembling witchcraft and a consecrated pot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Black magic
  • Chhatrapati Sambhajinagar
  • School

संबंधित बातम्या

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक
1

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें
2

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
3

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!
4

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.