Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली ‘शिट्टी’ तर कोणाला ‘बासरी’? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी!

Sambhajinagar Election News: महापालिका निवडणूक कार्यक्रम अंतर्गत २ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, ३ रोजी मैदानात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 04, 2026 | 02:16 PM
छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली 'शिट्टी' तर कोणाला 'बासरी'? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी! (Photo Credit - X)

छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली 'शिट्टी' तर कोणाला 'बासरी'? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक
  • चिन्ह वाटप पूर्ण! अपक्षांमुळे प्रस्थापितांची धाकधूक वाढली
  • पाहा कोणाला कोणते चिन्ह मिळाले
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ, तुतारी, पंजासारख्या चिन्हांवर लढणाऱ्या पक्षीय उमेदवारांना शिट्टी, ट्रॅक्टर, कपबशी, कपाट, नारळ, हेलिकॉप्टर, बासरी अशा कितीतरी चिन्हांवर लढणाऱ्या अपक्षांचे आव्हान असणार आहे. यंदा अपक्षांची संख्या अधिक असल्याने मातब्बर उमेदवारांना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत.

पक्षीय चिन्हे विरुद्ध अपक्षांची ‘मुक्त’ चिन्हे

महापालिका निवडणूक कार्यक्रम अंतर्गत २ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, ३ रोजी मैदानात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात भाजप, शिवसेना-शिंदे गट, शिवसेना-उबाठा, काँग्रेस, रा. कॉ. (श.प.), रा. कॉ. (अ.प.), आम आदमी पार्टी, एमआयएम या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले राष्ट्रीय पर्भासह इतर राज्यांकडे नोंदणीकृत पक्ष, नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांच्यासह करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय पक्षांना कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ, तुतारी, पंजा, पतंग, झाडू ही निशाणी देण्यात आली तर अपक्ष उमेदवारांना शिट्टी, ट्रॅक्टर, कपबशी, कपाट, नारळ, हेलिकॉप्टर, बासरी या चिन्हांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, कोणत्या आपल्याला चिन्हावर लढायचे आहे याची माहिती उमेदवाराला निवडणूक अर्ज सादर करताना द्यावी लागते. यात प्रथम प्राधान्य, द्वितीय आणि तृतीय असे तीन पर्याय द्यावे लागतात, उमेदवारांनी आपल्या आवडीचे जे चिन्ह दिलेले होते ते त्यांना देण्यात आले तर काही ठिकाणी एकाच चिन्हांची दोन ते तीन दावेदार असल्याने चिठ्ठचा टाकून चिन्ह देण्यात आले.

प्रचाराचा धडाका सुरू: कोणाची काय तयारी?

निवड‌णूक चिन्ह मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांनी आधीच आपले प्रचार साहित्य तयार केलेले आहेत. त्यावर त्यांचा प्रचारही सुरू झालेला आहे. तर अपक्षांना आज चिन्ह भेटल्यानंतर त्यांनी पॉम्पलेट्स, बॅनर्स, टोप्या, झेंडे असे प्रचारसाहित्यांची ऑर्डर दिली आहे. अंदाजे दोन दिवसात हे प्रचार साहित्य त्यांच्या ताब्यात येईल, यानंतर त्यांचा प्रचार सुरु होणार आहे. तूर्तास राष्ट्रीय पक्षातील उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरु झालेला आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Politics : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

अपक्षांना करावी लागते मागणी

आपल्याला कोणत्या चिन्हावर लढायचे आहे याची माहिती उमेदवाराला निवडणूक अर्ज सादर करताना द्यावी लागते. यात प्रथम प्राधान्य, द्वितीय आणि तृतीय असे तीन पर्याय द्यावे लागतात. उमेदवारांनी आपल्या आवडीचे जे चिन्हे दिलेले असते ते त्यांना देण्यात येते. एकच चिन्ह दोन जणांनी मागितले असेल तर चिठ्ठी टाकली जाते. ज्यांना चिन्ह मिळाले नाही त्याला त्याचा दुसरा किंवा तिसरा पर्यायाचे चिन्ह दिले जाते. ते चिन्ह आयोगाकडे उपलब्ध नसेल तर आयोग मुक्त चिन्हातून चिन्हाचे वाटप करते. यंदा काही ठिकाणी बॅट आणि गॅस सिलिंडर चिन्हांची दोन ते तीन दावेदार असल्याने चिठ्ठधा टाकून चिन्ह देण्यात आले.

चिन्ह वाटपाची अशी असते पद्धत

चिन्ह वाटप करताना आधी राष्ट्रीय नोदणीकृत पक्षांना चिन्ह वाटप केली जातात. यात तीन गट पडले जातात. पहिल्या गटात भाजप, शिवसेना-शिंदे गट, शिवसेना-उबाळा, कॉग्रेस, रा. कॉ. (श.प.), रा. कॉ. (अ.प.) या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले राष्ट्रीय पक्षांना चिन्हे दिली जातात. यानंतर दुसऱ्या गटात इतर राज्यांकडे नोंदणीकृत पक्षांना चिना दिले जातात. तिसऱ्या गटात नोंदणीकृत जाते. यदा यात वंचित बहुजन आधाडी आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), राष्ट्रीय अमान्यताप्राप्त पक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले समाज पक्ष (रासघ) हे तीन पक्ष आहेत. शेवटी अपक्ष उमेदवारांना विन्ह दिली जातात.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चार टप्प्यांत चिन्हांचे वाटप करण्यात आले:

गट उमेदवाराचा प्रकार प्रमुख चिन्हे / पक्ष
गट १ राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त पक्ष कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ, तुतारी, पंजा, पतंग, झाडू
गट २ इतर राज्यांतील नोंदणीकृत पक्ष नोंदणीकृत चिन्हे
गट ३ अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष वंचित बहुजन आघाडी, रासप, बीआरएसपी
गट ४ अपक्ष उमेदवार शिट्टी, ट्रॅक्टर, कपबशी, हेलिकॉप्टर, बासरी इ.

हे देखील वाचा: Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Web Title: See the complete list of independent candidates symbols in the municipal election battleground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Election News
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
1

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
2

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
3

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक
4

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.