Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्‌यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्‌यांचा वापर वाढवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 09:58 PM
Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात
Follow Us
Follow Us:

 

  • पैठणमध्ये दुहेरी संकट!
  • गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला
  • वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात
Paithan News: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षांच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसत असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने पैठण शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंडक्शन शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार पडत असून शहरातील अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील दारूसलाम, सादात मोहल्ला, धनगरवाडा, जोहरीवाडा, भवानीनगर, इंदिरानगर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज गूल होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या कामकाजाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी

विशेषतः ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्‌यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्‌यांचा वापर वाढवला आहे. परिणामी शहरातील वीज यंत्रणेवर अचानक वाढलेला भार सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होत आहे. या परिस्थितीमुळे महावितरणच्या कामकाजाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाथ षष्टी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले होते. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान

गॅसटंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर संकट

दुसरीकडे, शासन तसेच इंडेन कंपनीकडून कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने शहरातील हॉटेल व्यवसायावरही संकट ओढवले आहे. अनेक हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येत आहे. परिणामी हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि वीजपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकां कडून करण्यात येत आहे.

Web Title: Use of induction cooktops rises due to gas shortage city plunged into darkness as power grid comes under strain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • LPG Gas
  • Paithan

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.