Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत – जयंत पाटील

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून, त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 19, 2022 | 04:30 PM
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत – जयंत पाटील
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची  प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते, मात्र मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (DCM) या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केली. पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून, त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

[read_also content=”राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट https://www.navarashtra.com/maharashtra/declare-wet-drought-in-state-provide-immediate-relief-to-farmers-ajit-pawar-met-the-chief-minister-337666.html”]

दरम्यान, सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली मात्र पैशांची जुळणी झालेली नाही असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही, यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. उध्दव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत असेही जयंत पाटील म्हणाले.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल असेही जयंत पाटील म्हणाले. पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती, त्यात पूणे महानगरपालिका कमी पडली असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.

Web Title: Chief minister and deputy chief minister are running out of days to manage delhi jayant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2022 | 04:30 PM

Topics:  

  • delhi
  • Deputy Chief Minister
  • jayant patil

संबंधित बातम्या

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू
1

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर
4

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.