Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एवढ्या जगात माय मानतो मराठी! अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज्यामध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारकडून पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये माय मराठी भाषेचा देखील समावेश आहे. यामुळे मराठी भाषिक सुखावले असून आनंद व्यक्त केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 04, 2024 | 08:28 AM
cm eknath shinde reaction on marathi abhijat darja

cm eknath shinde reaction on marathi abhijat darja

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. हजारों वर्षांच्या इतिहास असलेल्या आपल्या भाषेला आज अभिजात म्हणून ओळख मिळाली आहे. राज्य सरकारचा अनेक वर्षांचा लढा यशस्वी झाला असून मराठी माणसांसाठी हा निर्णय लाखमोलाच मानला जात आहे. केंद्र सरकारने घेतलेला या निर्णयामुळे मराठी भाषा सातासमुद्रांपार पोहोचण्यास आणखी वेग येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारने बैठकीत मराठी भाषेसह अन्य पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठी, बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, एवढ्या जगात माय मानतो मराठी! धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद! अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एवढ्या जगात माय मानतो मराठी!
धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य… https://t.co/vgdMhZtbsg
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर मराठीमध्ये पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात… — Narendra Modi (@narendramodi) October 3, 2024

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गडकरी म्हणाले की, “समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

Web Title: Chief minister eknath shinde gave the first reaction after marathi language was given elite status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 08:28 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.