
गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
पहिल्या धक्क्यानंतर सुमारे दोन तासांनी पुन्हा जोरदार हादरा जाणवला. या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.5 नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार 4.5 तीव्रतेचा भूकंप सकाळी 9.43 वाजता झाला आणि त्याची खोली 5 किलोमीटर होती. दुसऱ्या धक्क्यामुळे औंढा नागनाथसह हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत नागरिकांमध्ये भीती पसरली. पिंपळदरी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी दुसऱ्या धक्क्यापूर्वी गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले.
Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट
सध्याच्या माहितीनुसार या दोन धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हिंगोली परिसरात गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून भूकंपीय हालचाली जाणवत आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी बसलेल्या सलग धक्क्यांमुळे नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे.
भूकंपाच्या वेळी घाबरून धावपळ करण्याऐवजी स्वतःचे आणि कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
– Drop, Cover, Hold On: खाली बसा, मजबूत टेबल किंवा फर्निचरखाली आसरा घ्या आणि ते घट्ट पकडून ठेवा.
– घरातून तातडीने बाहेर धावू नका: हादरे सुरू असताना जिने किंवा बाहेर पडण्याच्या मार्गावर गर्दी करणे धोकादायक ठरू शकते. लिफ्टचा वापर करू नका.
– काचा आणि जड वस्तूंपासून दूर राहा: खिडक्या, काचेचे दरवाजे, कपाटे, पंखे किंवा पडू शकणाऱ्या वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवा.
– बाहेर असाल तर मोकळ्या जागेत जा: इमारती, झाडे, विजेचे खांब, होर्डिंग्ज आणि उड्डाणपुलांपासून दूर राहा.
– वाहन चालवत असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा: पूल, बोगदे, मोठ्या इमारती आणि विजेच्या तारांपासून दूर वाहन थांबवा आणि हादरे थांबेपर्यंत वाहनातच राहा.
– हादरे थांबल्यानंतर नुकसान तपासा: गॅस गळती, विद्युत तारा किंवा इमारतीला पडलेल्या भेगा दिसल्यास संबंधित यंत्रणेला कळवा. गंभीर नुकसान झालेल्या इमारतीत पुन्हा प्रवेश करू नका.
– आफ्टरशॉकसाठी तयार राहा: मुख्य भूकंपानंतर पुन्हा धक्के जाणवू शकतात. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.
– आपत्कालीन साहित्य तयार ठेवा: पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे, टॉर्च, पॉवर बँक, प्राथमिक उपचार साहित्य आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती सहज उपलब्ध ठेवा.
– अफवांवर विश्वास ठेवू नका: प्रशासन, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS), NDMA किंवा अधिकृत सरकारी यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवा.
Geology News : पृथ्वीसाठी नव्या संकटाची चाहूल; 9 महिन्यांत 28,000 हून अधिक भूकंपांमागे एक मोठं कारण