Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Navarashtra Impact: रामलीला गार्डनमधील महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत नवराष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून, महिलांच्या सुरक्षेसाठी रामलीला गार्डनमध्ये आता दररोज पोलिसांची गस्त घालण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 03, 2026 | 05:18 PM
नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Follow Us
Follow Us:
  • नवराष्ट्राच्या बातमीची दखल
  • शिवसैनिकांचा दणका
  • रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
 

विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदरमधील नवघर परिसरातील रामलीला गार्डनमध्ये वाढलेले गैरप्रकार, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा वावर आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ‘नवराष्ट्र’ने बातमीच्या माध्यमातून मांडल्यानंतर पोलिस प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. पोलिसांनी गार्डनची पाहणी केली असून, परिसरात नियमित पोलिस गस्त ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ गार्डनमध्ये येणाऱ्या महिला आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

गर्दुल्यांचा वावर

रामलीला गार्डनमध्ये गेल्या काही दिवसांपासून नशेचे पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींचा तसेच गर्दुल्यांचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिक महिलांकडून करण्यात येत होती. सकाळी आणि संध्याकाळी योग, व्यायाम तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या महिलांना त्यामुळे भीतीच्या वातावरणात वावरावे लागत होते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता.

‘नवराष्ट्र’च्या बातमीची ठिणगी अन शासनाला जाग! अहिल्यानगरमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; आता ‘सरसकट कर्जमाफी’साठी स्वाभिमानी आक्रमक

काही दिव्यांची तोडफोड

गार्डनमधील काही दिव्यांची तोडफोड करण्यात आल्याचे तसेच लोखंडी ग्रील कापून नेल्याचेही निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडे वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

गार्डनमधील सुरक्षेचा मुद्दा

दरम्यान, स्थानिक महिलांनी शिवसेना शहरप्रमुख सचिन मांजरेकर यांच्याकडेही आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर मांजरेकर यांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून गार्डनमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गार्डनमध्ये जाऊन पाहणी केली. पोलिसांनी गार्डन परिसरात नियमित गस्त वाढवण्याची कार्यवाही सुरू केली असून, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे गार्डनमधील गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, वंदना पाटील यांच्या पुढाकाराने गार्डनमधील तुटलेल्या ग्रील आणि स्लायडिंगच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. पोलिसांची नियमित गस्त, दुरुस्तीची कामे आणि प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या गेल्यास रामलीला गार्डन पुन्हा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित ठिकाण बनेल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Navarashtra Impact: शेवगावातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा! ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर प्रशासनाची बैठक; मोजणीसाठी अर्ज दाखल

Web Title: Navarashtra impact shiv sena action police patrolling ramlila garden women safety sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navarashtra Impact
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
1

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
2

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
3

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
4

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.