Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमचं सरकार फेसबुक लाइव्ह नाही तर…; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात

आमचं महायुतीचं सरकार हे फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 16, 2024 | 11:58 AM
आमचं सरकार फेसबुक लाइव्ह नाही तर...; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात

आमचं सरकार फेसबुक लाइव्ह नाही तर...; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात

Follow Us
Follow Us:

सासवड : आमचं महायुतीचं सरकार हे फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार असून, कोणतीही योजना आम्ही बंद करणार नाही, असे आश्वासन त्यांनी सासवड येथील जाहीर सभेत बोलताना दिले.

राज्यात महविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षात सिंचनाचे फक्त चार प्रकल्प पूर्ण केले. आपल्या काळात शेकडो प्रकल्प पूर्ण करून शेती ओलिताखाली आणली. शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पिकविमा योजना, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना सुरु केले. आणि हे कपटी सावत्र भाऊ कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना हाकलून दिले. आम्हाला भीक देता का म्हणाले. पैसे दिल्यावर लवकर काढून घ्या नाही तर योजना बंड पडली म्हणून सांगतील, असे सांगून नोव्हेंबर पर्यंत पैसे दिले असून, निवडणूक होताच डिसेंबरचे पैसे पण देणार, ही लेना बँक नाही तर देना बँक आहे. तुमच्या काळात फक्त माझे काय आणि मला काय यात गेले. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

तुमच्या अडीच वर्षाच्या काळात कंपन्या, उद्योग, मंदिरे सर्व बंद होती, आम्ही सरकार मधून बाहेर पडलो आणि पुन्हा सर्व सुरु केले. तुम्ही फक्त फेसबुक लाइव्ह होता. पण आम्ही फेस तू फेस शेतकऱ्यांच्या दारात जावून योजना दिल्या. आम्ही सुरु केलेले प्रकल्प बंद करण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा ना ? अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला.

महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोर विधानसभा शिवसेनेचे उमेदवार रमेश कोंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, वासुदेव काळे, ममता शिवतारे, दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, निलेश जगताप, पंकज धिवार, राहुल शेवाळे, शालिनी पवार, ज्योती झेंडे, अतुल म्हस्के, दत्तात्रय काळे, डॉ. राजेश दळवी, ऍड. नितीन कुंजीर, मंदार गिरमे आदी उपस्थित होते.

पुरंदर आपली अस्मिता

पुरंदर तालुका शत्रूच्या हाती पडता कामा नये. मला दिलेला शब्द विजय शिवतारे यांनी पाळला तसा मीही पाळला आहे. शिवसेनेचा भगवा असाच फडाकवित ठेवायचा आहे. शिवतारे यांच्या नावातच विजय आहे, त्यांच्या वडिलांचे नाव सोपान म्हणजे शिडी ही विजयाची शिडी चढणार आहे. शिवतारे म्हणजे महादेव आहे. त्यामुळे बापूंचा विजय नक्की आहे. विधानसभेचे तिकीट आजच फिक्स करतो. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले; जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर जहरी टीका

विजय शिवतारे यांनी तालुक्यात मोठा निधी आणला आहे. त्यांना संपूर्ण राज्य माहिती आहे. त्यांना राज्यात अनेक प्रकल्प राबविले आहेत. उरुळी देवाची, फुरसुंगी मधील लोकांचा टॅक्स, सासवड, जेजुरी मधील पाण्याची योजना, खंडोबा साठी ३४९ कोटीला मान्यता दिली, मावडीची जमीन शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे कोणताही प्रकल्प जनतेच्या डोक्यावर लादनार नाही. असे सांगून एकीकडे शिवतारे कामे आणीत असताना पुरंदरचे विद्यमान काय फक्त सासवड पुरतेच आहेत काय ? एवढी सर्व कांमे झाली असताना इथले आमदार झोपले होते का ? अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय जगताप यांनाही फटकारले आहे. तर महायुतीचे फक्त विजय शिवतारे असून, इतर कोणी फसवत असेल तर सावध राहा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे यांना सूचक इशारा दिला आहे.

Web Title: Chief minister eknath shinde has criticized uddhav thackeray in a meeting in saswad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Eknath Shinde
  • Saswad
  • Uddhav Thackeray
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.