Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग, मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन

महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावास राज्यातील युवा उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 21, 2025 | 05:43 PM
मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग, मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन (फोटो सौजन्य-X)

मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग, मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रात कौशल्य विकास आणि उद्योजकतेला अभूतपूर्व गती मिळत आहे. तरुणांना संधी देण्याचे, पारंपारिक कौशल्यांना नवे रूप देण्याचे आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे हे सुवर्णयुग आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे महाराष्ट्र सक्षम, आत्मनिर्भर आणि पुढारलेले राज्य बनत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दावोसमधून, आपल्या राज्याला विक्रमी गुंतवणूक मिळाली. त्यामधून आज नवी मुंबई येथे इनोव्हेशन सिटी उभारण्याचे काम सुरु झाले असून, हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

‘वा! चित्राताई वाघ वा! आज बाळासाहेब ठाकरे असते तर…’; नारायण राणेंचं ते ट्विट चर्चेत

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे आज राज्याला एक नवे स्टार्टअप धोरण मिळणार असून, ही नवीन उद्योजकांसाठी अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. आज नमो रोजगार मेळावे, युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास केंद्र, महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य, विदेशात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या सारखे अनेक प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे कौशल्य विकास विभागाला राबवता आले. मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री कोण हे तेच ठरवतील पण कौशल्य विकास विभाग, हा त्यांचा लाडका विभाग आहे आणि त्यामुळेच इतके उपक्रम शक्य झाले!, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राज्यातील कौशल्य विकासासाठी महत्वाच्या घोषणा

Startup Next Door: महाराष्ट्र सरकारच्या ‘Startup Next Door’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत १ लाख नव्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे स्थानिक स्तरावर नव्या व्यवसायांना चालना मिळेल आणि स्टार्टअप संस्कृती अधिक बळकट होईल.

विश्वकर्मा भवन: महाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १२ बलुतेदार समाजासाठी ‘विश्वकर्मा भवन’ स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून परंपरागत व्यवसायांना तंत्रज्ञानाची जोड मिळेल आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी वाढतील.

ITI विकासासाठी नवीन उपक्रम: येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील १०० ITI संस्था, आस्थापना आणि स्वयंसेवी संस्थांना प्रायोगिक तत्वावर दत्तक देण्यात येणार आहे. यामुळे उद्योगांसोबत संस्थांचा थेट संबंध निर्माण होऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाची संधी मिळेल.

Pune News: पुणे महापालिकेच्या ‘या’ कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ होणार; मंत्री उदय सामंत

Web Title: Chief minister favourite department is skill development department mangal prabhat lodha says in legislative council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
1

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
2

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
3

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष
4

Latur News : आदर्श कॅम्पसवर कारवाईची होणार? लातूर महापालिकेच्या तपासणीकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.