Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Powai Lake Musical Fountain : पवई तलावात आता रंगणार शिवरायांच्या पराक्रमाची गाथा; १८० मीटरचा भव्य म्युझिकल फाउंटन सुरू

Powai Lake Musical Fountain : मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि मुंबईचा गौरवशाली वारसा सादर केला जाणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 09:51 PM
Mumbai Gets New Tourist Attraction with Grand Light and Sound Show ( मुंबईला मिळाले नवीन पर्यटन आकर्षण: भव्य प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम )

Mumbai Gets New Tourist Attraction with Grand Light and Sound Show ( मुंबईला मिळाले नवीन पर्यटन आकर्षण: भव्य प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम )

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी या शोचा आनंद घ्यावा 
  • विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर होणार 
  • ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार  
Powai Lake Musical Fountain :  पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन मुंबईतील नवे पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्यात आला आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शोमध्ये सादर केली जाणार आहे. या फाउंटनमुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल. तसेच पवई तलावाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन रविवारी सायंकाळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी या शोचा आनंद घ्यावा

यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, की सुमारे १८० मीटर लांबीचा हा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या फाउंटन्सपैकी एक ठरणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची गौरवगाथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भव्य स्वरूपात सादर केली जाणार आहे. मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांनी या शोचा आनंद घ्यावा. पवई तलावाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याबरोबरच त्याच्या स्वच्छतेसाठीही विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर होणार

या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. यामध्ये संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या आकर्षक सुविधांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, इतिहास, संस्कृती आणि वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

Devendra Fadnavis : SMA Type 1 ग्रस्त यशश्रीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थांबवला ताफा; उपचारांसाठी दिले मदतीचे निर्देश

३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार

या फाउंटनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन (हवामिश्रण) या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार असून, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि स्थानिक तापमानात घट होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अपेक्षित आहेत.

उद्घाटनानंतर म्युझिकल फाउंटनचा पहिला शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आधुनिक तंत्रज्ञान, इतिहास आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रकल्प मुंबईच्या पर्यटन नकाशावर पवई तलावाला नवे स्थान मिळवून देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको

 

Web Title: Mumbai powai lake musical fountain light sound show tourist attraction sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Government of Maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या नावाने बाहेरच्या स्ट्रॉबेरीची विक्री; GI टॅगचा गैरवापर करणाऱ्यांना कायदेशीर इशारा
1

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या नावाने बाहेरच्या स्ट्रॉबेरीची विक्री; GI टॅगचा गैरवापर करणाऱ्यांना कायदेशीर इशारा

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार
2

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा वाढता धोका; २०३० पर्यंत मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट
3

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा वाढता धोका; २०३० पर्यंत मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.