मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांनी निव़णुकांची तयारी सुरू केली आहे. मोर्चे सबा, दौऱे, मेळावे सुरू झाले आहे. इच्छुकांनीदेखील आपल्या उमेदवारीसाठी रांगा लावायला सुरूवात केली आहे. युती आणि आघाडीकडून मतदारसंघांच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत. पण निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत.
येत्या दोन महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होतील, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी नुकतीच सभा घेतली. या सभेत त्यांनी दिलीप लांडे यांना निवडून द्या असे आवाहन करत आगामी निवडणुकांचे संकेतही दिले. यावेळी त्यांनी झोपडपट्टू पुनर्वसन प्रकल्प, लाडकी बहीण योजना यांसह इतर अनेक विषयांवरही भाष्य केले.
हेदेखील वाचा: दुबईतही लोकप्रिय आहे जिनीयस पार्ले-जी! पण काय आहे किंमत? जाणून घ्या
चांदिवली येथील मिठी नदी शेजारील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले. या पुर्नवसमातील नागरिकांच्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत तेच राज्याच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे लाभार्थी आहेत. वंचित महिलांना 1,500 रुपयांच्या मासिक मदतीचे महत्त्व ते कधीही समजू शकत नाही. सुमारे 2 कोटी महिलांनी या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी फॉर्म भरले आणि त्यापैकी 1.5 कोटी पात्र महिलांना एनडीए सरकारने वचन दिलेले 1,500 रुपये मानधन मिळाले आहे.
ते म्हणाले, “विरोधक या योजनेची खिल्ली उडवतात की ते (सरकार) या योजनेतून लाच देत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या लोकांना 1,500 रुपयांची किंमत समजणार नाही. माझ्या 1,500 रुपयांची किंमत त्या बहीणींनाच माहिती आहे. अशा अप्रत्यक्ष शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
हेदेखील वाचा: वाघ आणि लहान मुलाची क्यूट फाईट; निरागसतेचे अनोखे उदाहरण, व्हिडीओ व्हायरल
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा होताच विरोध चुकीचा ठरला, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. रक्कम जमा झाल्यानंतर विरोधकांनी पैसे परत घेतले जातील अशी अफवा पसरवली. पण हे सरकार घेणारे सरकार नाही, देणारे सरकार आहे.”
राज्याच्या तिजोरीला वार्षिक 46 हजार कोटींचा फटका बसणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली. ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना लक्ष्य करते.पण ही योजना आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे आणि मासिक स्टायपेंडचे वर्णन “माफक” आहे, असे विरोधक म्हणत आहेत. पण त्यांनी महिला लाभार्थ्यांना “सरकारचे हात बळकट करण्यासाठी” प्रोत्साहित केले आहे, त्यांच्या पाठिंब्यामुळे मासिक वेतनात वाढ होऊ शकते.
हेदेखील वाचा: साहेब, तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही गावं सांभाळतो; जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांची भावना