तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वाचं आवडतं बिस्कीट कोणतं? जिनीयस पार्ले-जी! पार्लेने 1938 मध्ये पहिल्यांदा पार्ले-ग्लुको नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. हे बिस्किट भारतात मोठ्या प्रमाणात विकले जाते. पार्ले-जी बिस्किट भारतात खूप लोकप्रिय आहे. याशिवाय जगातील इतर देशांमध्येही हे बिस्किट विकले जाते. भारतात हे बिस्कीट 5 ते 10 रुपयांना मिळतं. पण या बिस्कीटाची दुबईमधील किंमत किंचीत जास्त आहे.
दुबईतही लोकप्रिय आहे जिनीयस पार्ले-जी! पण काय आहे किंमत? जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
पार्ले-जी बिस्किट भारतात खूप लोकप्रिय आहे. शिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही पार्ले-जी बिस्किटे आवडतात.
भारतीय नागरिक मोठ्या संख्येने दुबईला भेट देतात. याशिवाय भारतीय नागरिक दुबईमध्ये नोकरी आणि व्यवसाय करतात.
पार्ले-जी बिस्किटे दुबईतही विकली जातात. दुबईबद्दल बोलायचे झाले तर 50 ग्रॅम पार्ले जी बिस्किटांची 24 पॅकेट तिथे 8.25 दिराममध्ये उपलब्ध आहेत.
50 ग्रॅमच्या 24 पॅकेटची किंमत सुमारे दुबईत 188 रुपये असेल. म्हणजे एका पॅकेटची किंमत 7 रुपयांपेक्षा जास्त असेल.
भारतात 50 ग्रॅम पार्ले जी बिस्किटचा दर 5 रुपये आहे. म्हणजेच 50 ग्रॅमच्या 24 पॅकेटची किंमत भारतात 120 रुपये आहे.
दुबईतील पार्ले-जी भारतापेक्षा किंचित महाग आहे.