Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadanvis : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

CM Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 11, 2026 | 08:01 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26’ 
  • ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला  
  • कार्यक्रमाचे आयोजन यूथ फेस्टिव्हल मैदानावर करण्यात आले 
CM Devendra Fadanvis :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ पुरस्कार वितरण आणि २०२६-२७ या वर्षासाठी अभियानाचा शुभारंभ पार पडला हा कार्यक्रम नाशिक येथे पार पडला, ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध पंचायतराज अभियान 2025-2026 अंतर्गत विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’ आणि ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

‘ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26’

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, तसेच पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा देण्यात आला. त्याच बरोबर गुणानुक्रमे जिल्हा परिषद गटात नाशिक, पुणे आणि सांगली तर पंचायत समिती गटात नाशिक,खालापूर (जि. रायगड) आणि राहाता (जि. अहिल्यानगर) या समित्यांचा प्रथम,द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अडाचीवाडी ता.पुरंदर प्रथम, खामशेत, ता. गुहागर, जि . रत्नागिरी आणि लाडूद, ता. बागलाण, जि. नाशिक (द्वितीय विभागून), उटी बु.ता.औसा,जिल्हा लातूर, कोतवालबर्डी, जिल्हा नागपूर (तृतीय विभागून) या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन यूथ फेस्टिव्हल मैदानावर करण्यात आले

या कार्यक्रमाचे आयोजन यूथ फेस्टिव्हल मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,पालकमंत्री गिरीश महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार गोकुळ गीते यांची उपस्थिती होती.

तसेच प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डाॅ राहूल आहेर, ॲड. राहूल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, नितीन पवार, विवेक कोल्हे, उपमहापौर विलास शिंदे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले सरपंच, लोकप्रतिनिधी ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येत या कार्यक्रमात सहभागी झाले.

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम

 

Web Title: Chief minister samruddha panchayatraj abhiyan 2025 26 awards nashik sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • BJP Government
  • gram panchayat

संबंधित बातम्या

CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय
1

CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.