Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवार यांची उपरोधिक टीका

मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. तरीदेखील नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याची घाई दोन्ही मंत्रिमंडळाला झालेली दिसते. जनतेतून फक्त नगराध्यक्षपद व सरपंचपद कशाला? राष्ट्रपती व मुख्यमंत्री निवडही जनतेतूनच करा, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2022 | 03:26 PM
राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजित पवार यांची उपरोधिक टीका
Follow Us
Follow Us:

बारामती : मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. तरीदेखील नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याची घाई दोन्ही मंत्रिमंडळाला झालेली दिसते. जनतेतून फक्त नगराध्यक्षपद व सरपंचपद कशाला? राष्ट्रपती व मुख्यमंत्री निवडही जनतेतूनच करा, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

बारामती येथे पत्रकारांशी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बहुमत ज्या पक्षाला असते, त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात. राज्यातही १४५ आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात. अशाच पद्धतीने नगराध्यक्ष व सरपंचपदाच्या निवडी होत होत्या. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असल्यास काय होते, याचा अनुभव यापूर्वी अनेक वेळा घेतला आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण ही बाब लोकशाहीला घातक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1967 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी ठरवलेली धोरणे महत्त्वाची आहेत.

नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याबाबत विधिमंडळात चर्चा करण्याची आवश्यकता होती. आमदाराचे मत देखील विचारात घेतले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार दिला. याबाबत आपले दुमत नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

नामांतराच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी मंत्रिमंडळ विस्तार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, हा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे घेतील.

Web Title: Choose the president the chief minister from among the people criticism of ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 03:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Pune
  • बारामती

संबंधित बातम्या

Baramati Politics: सुनेत्रा पवारांचा ‘अजितदादा स्टाईल’ दणका! शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
1

Baramati Politics: सुनेत्रा पवारांचा ‘अजितदादा स्टाईल’ दणका! शासकीय रुग्णालयातील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट
2

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट
3

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

किशोर मासाळ यांच्या वक्तव्यावरुन नगरसेवक आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या ओएसडीकडे सह्यांचे निवेदन सादर
4

किशोर मासाळ यांच्या वक्तव्यावरुन नगरसेवक आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या ओएसडीकडे सह्यांचे निवेदन सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.