फोटो सौजन्य: iStock
खोपोली/प्रवीण जाधव: खोपोलीतील प्रभाग नंबर एक लौजी व परिसरातील नगररचना विभागाने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या परिसरातील हजारो खोपोलीकरांचे आरोग्य आणि आयुष्य धोक्यात येईल, असा नागरिकांचा आरोप आहे. यामुळे आज खोपोली नगरपरिषदेवर स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला. त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवत, डम्पिंग ग्राउंड नामंजूर करावे अशी मागणी केली. तसेच, मुख्याधिकारी पंकज पाटील यांना या संदर्भात एक पत्र सादर करून, त्यांच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा प्रकल्प रद्द केला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
अलिबागमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा धुडगूस; नशेत कार चालवून वाहनांना दिली धडक, पोलिसांसोबतही घातला वाद
खोपोली शहरांतर्गत येणारी लौजी , चिंचवली, वासरंग, शेडवली, उदय विहार, श्रीराम नगर, सरस्वती नगर, नवघर इत्यादी गावे या डम्पिंग ग्राउंड मुळे बाधित होणार आहेत , हा नियोजित प्रकल्प रद्द करण्यासाठी या परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक मोर्चा आणून शांत निदर्शने केली. याबाबतची हरकतीचा निवेदन ग्रामस्थां तर्फे देण्यात आले हे निवेदन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी स्वीकारले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने समीर शिंदे व किशोर पाटील यांनी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्याधिकारी पंकज पाटील यांना विनंती केली.
बिहार मधील बोधगया येथिल महाबोधी बुध्दाविहार वरती असणारी समितीत बदल करावा यासाठी बोधगया येथे सुरु असलेल्या भिक्कू संघ यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून खोपोलीत फुले, शाहू, आंबेडकर विचारमांचाच्या वतीने धरणे आंदोलन सुरु.
Pune News: पुण्यातील ‘ते’ होर्डींग महापालिकेकडून जमिनदोस्त; नेमके प्रकरण काय? पहाच…
बिहार मधील बोधगाया येथील बुधविहारा बाबत तयार करण्यात आलेला 1949 चा कायदा रद्द करून जी कमिटी या कायद्यानुसार येथे काम करते त्यात बदल व्हावा यासाठी गेले वीस एकावीस दिवस भिक्कू संघ धर्मागुरू तेथे आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाना पाठिंबा म्हणून रायगड जिल्ह्यातील खोपोली मध्ये फुले शाहू आंबेडकर विचारमांचाच्या वतीने तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने जाहीर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
सदर धरणे आंदोलन खोपोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्माराकासमोर सुरु करण्यात आले असून जो पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी स्पष्ट केले आहे.