फोटो सौजन्य: iStock
अलिबाग म्हटलं की अनेकांना शांत समुद्र, डोलणारी नारळाची झाडं आणि तेथील उत्कृष्ट हॉटेल्स आठवतात. त्यामुळेच, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक अलिबागला जातात. अलिबागचा आकर्षक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा पर्यटकांना आकर्षित करत राहतो. खासकरून शनिवार आणि रविवारी तरअलिबागमध्ये पर्यटकांची जत्रा भरलेली असते. हे शांत आणि सुंदर ठिकाण असलं तरी, काही वेळा अतिउत्साही पर्यटकांच्या वर्तणुकीमुळे अलिबागकरांना त्रास होतो. काही जण शहरात धिंगाणा घालून शांततेचा भंग करतात, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अस्वस्थता होऊ शकते. अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कर्जत स्थानकात अपघात टळला; तातडीने करण्यात आले उपचार
अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गुरुवारी (दि.6) दुपारी धुडगूस घालल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेवदंडा बायपास जवळ मद्यधुंद होऊन कार चालवत असताना त्यांना एका वाहनाला धडक दिली. सुदैवाने मोठी हानी टळली, पण या घटनेने वातावरण तणावपूर्ण होऊन गेले. पोलीस आणि स्थानिकांशी वाद घालण्याचीही माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये सूरज राजकुमार सिंग आणि त्याच्या सहलीत असलेली एक महिला या दोघांचा समावेश आहे. या दोघांना त्वरित अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांना प्राथमिक उपचार दिले गेले. पोलीस यांनी या घटनेत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर ठपका ठेवला आहे. मद्यपान करून वाहन चालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणे हे गंभीर गुन्हे मानले जातात, आणि यामुळे संबंधित पर्यटकांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारमधून काही पर्यटक अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांच्या कारने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर रेवदंडा बायपासजवळ एका वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मद्यधुंदीमध्ये त्यांनी वाहन चालविल्याने अपघातात पर्यटकही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांसह अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कारमध्ये काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच, पोलिसांसोबतही पर्यटकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे.