Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईप लाईन फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक, तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2025 | 01:15 PM
"शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन", कोतवली ग्रामस्थांचा इशारा

"शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन", कोतवली ग्रामस्थांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर
  • पाईपलाईन फुटल्याने खाडीचे पाणी दूषित
  • गावातील नागरिक, तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात
चिपळूण: लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने खाडीचे पाणी दूषित होत असल्याने व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी एमआयडीसीच्या औद्योगिक भवनात ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला नाही किंवा सांडपाणी थेट सोडण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांची समस्या ऐन दिवाळीत अधिकच गंभीर झाली होती. कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईप लाईन फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक, तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

सोमवारी झालेल्या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कुलकर्णी, एमआयडीसीचे अधिकारी, हळदणकर, सीईटीपीचे भूषण शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. सुनील भाऊ सावर्डेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता तांबे, सदस्य मंगेश तांबे, संगीता धापसे, जाफर परकर, केतन पेवेकर, रुपेश पेवेकर, अंकुश पेवेकर, रुपेश जुवळे, नरेश जाधव, सचिन तांबे, राजेंद्र तांबे, प्रथमेश धापसे, प्रल्हाद धापसे, सुनील जाधव, सत्यवान जुवळे, सचिन जुवळे, वसंत जुवळे, रुपेश जुवळे, विनोद आंब्रे आदी ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.

ग्रामस्थांनी बैठकीत मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, कोतवली गावाला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, गेल्या २०-२५ वर्षांपासून दूषित पाण्यामुळे शेती व फळबागांचे झालेले नुकसान भरून द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांना उद्योगांकडून शैक्षणिक दत्तक योजना राबवावी, तसेच परप्रांतीयांऐवजी स्थानिकांना रोजगार द्यावा, अशा मागण्यांचा समावेश होता.आजच्या वृत्तपत्रांमध्ये ग्रामस्थ पाईपलाईन फोडतात, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी ही बातमी दिली, त्यांचे नाव सांगावे, अन्यथा आपण फौजदारी गुन्हा दाखल करू, असेही सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी या वेळी सांगितले.

अधिकाऱ्यांनी या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. येत्या पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेऊन या समस्यांवर ठोस निर्णय घेण्याचेही त्यांनी सांगितले. सुनिलभाऊ सावर्डेकर ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत “आश्वासन नव्हे, कृती हवी” असे स्पष्टपणे सांगत, मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

BMC Election: उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

Web Title: Clean water supply intense protest if demands are not met warning from kotwali villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra

संबंधित बातम्या

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
1

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?
2

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?

Maharashtra Politics : “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन
3

Maharashtra Politics : “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन

MNREGA Workers : ५९ हजारांहून अधिक मजुरांना मजुरीची प्रतीक्षा, मनरेगाचा ७२ कोटींहून अधिक निधी थकीत
4

MNREGA Workers : ५९ हजारांहून अधिक मजुरांना मजुरीची प्रतीक्षा, मनरेगाचा ७२ कोटींहून अधिक निधी थकीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.