Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

पिंपरी- चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पिंपरी-चिंचवडचे सौंदर्य कायम राखण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात सभापती अभिषेक बारणे यांनी माहिती दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 05:31 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पिंपरी-चिंचवडचे सौंदर्य कायम राखण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, आयलंड आणि मध्य दुभाजकांच्या (मीडियन) सुशोभिकरण व नूतनीकरणाची देखभाल आता ‘सार्वजनिक-खाजगी सहभाग’, ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ किंवा ‘सीएमआर’ तत्त्वावर केली जाणार आहे. यासंदर्भातील धोरणात्मक मसुद्याला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागामार्फत शहरातील विविध भागांत रस्ते, आयलंड आणि दुभाजकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. मात्र, या कामांची दीर्घकालीन आणि योग्य देखभाल करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत होते. महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार न पाडता खासगी क्षेत्राच्या सहभागातून हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हे नवीन धोरण अमलात आणले जात आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक ठिकाणांच्या देखभालीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि सौंदर्यीकरणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.

“पिंपरी-चिंचवड हे प्रगतशील आणि सुंदर शहर आहे. शहरातील रस्ते, आयलंड आणि दुभाजकांची नियमित व उत्तम देखभाल करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या तिजोरीवर ताण न आणता खासगी लोकसहभाग आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही देखभाल प्रभावीपणे केली जाईल. या धोरणामुळे शहराचे सौंदर्य टिकून राहील आणि नागरिकांना स्वच्छ व प्रसन्न वातावरण मिळेल.” — अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)

हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना महापालिका प्रशासनाने गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक कामांची स्वतःहून नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डे बुजवताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: The standing committee of the pimpri chinchwad municipal corporation has taken an important decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.