Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra 1st Conclave 2026: पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर…; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

मुंबईत आयोजित 'नवभारत महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६' मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन संकटावर मोठी घोषणा केली. पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून 'EV' आणि सोलर पॉवरवर भर देणार असल्याचे ते म्हणाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 19, 2026 | 08:43 PM
पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर...; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान (Photo Credit- X)

पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर...; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे टेन्शन मिटणार!
  • ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरप्लॅन
  • जाणून घ्या काय म्हणाले…
मुंबई: “सध्याचे मध्य पूर्व आणि होर्मूजचे संकट हे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवणारे आहे. जगातील बलाढ्य आणि विकसित देशांमध्ये इंधनाचे दर ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरगामी धोरणांमुळे भारतात इंधनाची सप्लाय चेन सुरळीत राहिली आहे. आपण या जागतिक संकटाचे रूपांतर एका मोठ्या संधीत करत असून, पुढील ५ वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील आपले अवलंबित्व पूर्णपणे संपवण्याच्या किंवा कमी करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहोत,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. नवभारत मीडिया ग्रुप आयोजित ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव 2026’ च्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा भव्य कार्यक्रम मुंबईतील कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्रासमोरील आव्हानांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भारताच्या आगामी ‘इंधन धोरणावर’ महत्त्वपूर्ण भाष्य केले.

विकसित देश डगमगले

जागतिक परिस्थितीची तुलना करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या संकटामुळे जगातील प्रगत अर्थव्यवस्थांनाही मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी आठवड्यातून २-३ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. आपल्या शेजारील पाकिस्तान देशात पेट्रोलचे दर प्रति लीटर साडेचारशे रुपयांवर (Rs 450) पोहोचले आहेत, आणि तरीही तिथे इंधन मिळेनासे झाले आहे. भारतामध्ये जागतिक तुलनेत केवळ ३ ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. मोदी सरकारने भारताचा ‘इंधन पोर्टफोलिओ’ वैविध्यपूर्ण केल्यामुळेच आपण या संकटाचा सामना अत्यंत सक्षमपणे करू शकलो आहोत.”

LIVE | 4th Edition of ‘NavaBharat Navarashtra: Maharashtra 1st Conclave 2026’ 🕡 6.31pm | 19-5-2026📍Mumbai.@TheNavbharatliv @navarashtra#Maharashtra #Mumbai #MagneticMaharashtra https://t.co/r5a3payP7n — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2026

Maharashtra 1st Conclave 2026: महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा संकल्प

पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तर ‘इलेक्ट्रिक वाहने’ ठरणार गेमचेंजर

या इंधन संकटाचा सामना करण्यासाठी भारताकडे भविष्यात काय पर्याय आहेत, याचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी ‘ईव्ही’ (EV) क्षेत्रातील क्रांतीवर प्रकाश टाकला, ते म्हणाले देशातील दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत सध्या सुमारे ७० टक्के हिस्सा हा इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळत आहे. तर, दुचाकींनंतर आता हळूहळू चारचाकी वाहनांच्या क्षेत्रातही ईव्ही तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे. भारतात सौर ऊर्जेची मोठी उपलब्धता असल्यामुळे आपल्याकडे विजेची अजिबात कमतरता नाही. हीच सौर ऊर्जा भविष्यात पेट्रोल-डिझेलला सक्षम पर्याय ठरणार आहे.

पर्यायी इंधन आणि आयातीवरील भार कमी करणार

आपण सध्या एका मोठ्या संक्रमण काळामधून जात आहोत, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या आव्हानाचा फायदा घेत आपण देशांतर्गत पर्यायी इंधनांच्या निर्मितीवर भर दिला पाहिजे. मग ती वीज असो, सीबीजी असो किंवा इतर पर्यायी इंधन स्रोत असोत; या क्षेत्रांमध्ये आपण जितकी जास्त गुंतवणूक करू, तितकेच आपले परदेशातून होणाऱ्या इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र या आव्हानाचा स्वीकार करून ‘ग्रीन एनर्जी’च्या दिशेने देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्याचां मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यांची संख्या निम्म्यावर; सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना

Web Title: Cm devendra fadnavis at navabharat maharashtra first conclave 2026 fuel policy ev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
1

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
2

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
3

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Nitin Gadkari: पेट्रोल-डिझेलचा खेळ खल्लास? इथेनॉलनंतर आता ‘या’ गोष्टीपासून बनणार इंधन; नितीन गडकरींचा सर्वात मोठा खुलासा
4

Nitin Gadkari: पेट्रोल-डिझेलचा खेळ खल्लास? इथेनॉलनंतर आता ‘या’ गोष्टीपासून बनणार इंधन; नितीन गडकरींचा सर्वात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.