महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय (फोटो सौजन्य-X)
Maharashtra cabinet Meeting In Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ ला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयासह वाढवान बंदर (तवा) ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (भरवीर) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यासह अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अतिरिक्त जमीन व्यापाऱ्यांकडून तत्वतः वापरली जाईल, या संदर्भातील सुधारित धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ सह एकूण ७ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नागपूर, जळगाव जिल्ह्यातील २ महत्त्वाचे निर्णय आहेत. तसेच, कुष्ठरोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मिळणारे अनुदान २००० रुपयांवरून ६००० रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
✅ बीडीडी चाळ
✅ ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह टनेल प्रकल्प
✅ बोरिवली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प
✅ उत्तन-विरार सी लिंक
✅ शिवडी-वरळी ईलेव्हेटेड कॉरिडॉर
✅ पुणे मेट्रो व पुणे रिंगरोड
✅ दहिसर ते भाईंदर लिंक रोड
✅ गोरेगाव-मागाठाणे डीपी रोड
✅ गोरेगाव–मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग
✅ विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर
✅ धारावी पुनर्विकास प्रकल्प
✅ जालना-नांदेड महामार्ग
✅ बांद्रा-वर्सोवा सी लिंक
✅ छत्रपती संभाजी नगर शहर पाणी पुरवठा प्रकल्प
✅ कुडूस आरे कनेक्टिव्हिटी
✅ कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प
✅ शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प
✅ वाढवण बंदर प्रकल्प
✅मुंबईतील मेट्रो लाईन 4 (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण), मुंबई मेट्रो 6 (स्वामी समर्थनगर-विक्रोळी), मेट्रो लाईन 2 बी (डीएन नगर ते मंडाळे), मुंबई मेट्रो 7 ए (अंधेरी-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2), मुंबई मेट्रो लाईन 9 (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर)
🔸आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे, त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत.
🔸मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे वेळेत निराकरण करावे.
🔸मेट्रो प्रकल्पांच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत.
🔸मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कुशल यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. मेट्रो व इतर सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक निधी तातडीने वितरीत करण्याची कार्यवाही करावी.
🔸प्रत्येकाचे स्वतंत्र डॅशबोर्ड न ठेवता, सर्व प्रकल्पांची माहिती केवळ सीएम डॅशबोर्डवर नोंदवली जावी आणि ती वेळोवेळी अद्ययावत केली जावी.
🔸प्रकल्पातील अडचणी सोडवण्यासाठी वॉररुम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करावी. आवश्यक बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडून त्यांची पूर्तता करावी. आढावा बैठकीनंतरही अडचणी आल्यास त्या वॉररुमला कळवाव्यात, जेणेकरून त्या तातडीने सोडवता येतील.
🔸वॉररुममधील प्रकल्पांची आणि निर्णयांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी.
यावेळी सांगण्यात आले की, वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप करण्यात येईल. तसेच नायगाव व एन.एम. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.