Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम पाहिलेले सुनीलकुमार मुसळे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 01:46 PM
“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम पाहिलेले सुनीलकुमार मुसळे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दादांच्या आठवणींनी भरलेली ही पोस्ट वाचताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत असून, त्यांच्या सहवासातील आठवणींचा हळवा पट त्यातून उलगडतो. मुसळे यांनी गेली अनेक वर्षांपासून अजितदादांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. अपघातावेळी ते स्वतः बारामती विमानतळावर अजितदांची वाट पाहत होते.

 

अजितदादांच्या निधनाला २८ फेब्रुवारी रोजी १ महिना पूर्ण झाला आहे, आजही बारामतीकर त्याच दुःखात आहेत. गेल्या अनेक दिवसानंतर मुसळे यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट मोठी चर्चेत आली आहे. मुसळे यांनी आपल्या पोस्टची सुरुवात “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे” या ओळींनी केली आहे. त्यांनी सांगितले की, एक महिना उलटून गेला असला तरी अजितदादांच्या अचानक झालेल्या निधनाचा आघात अजूनही मनावर कायम आहे. त्या घटनेच्या वेळी ते स्वतः बारामती विमानतळावर दादांना घेण्यासाठी गेले होते. विमान लँड होईल असे वाटत असतानाच ते पुन्हा वर गेले आणि काही वेळाने आले असता घडलेली दुर्घटना आयुष्यभर न विसरणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

दादांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून गेल्या महिनाभर सतत धावपळ सुरू असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. दादांचे नाव चिरंतन राहावे आणि त्यांनी सुरू केलेले काम पुढे जावे, यासाठी काम करत राहणेच हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुसळे यांनी एका भावनिक प्रसंगाचाही उल्लेख केला आहे. काही दिवसांच्या धावपळीनंतर पत्नीच्या आग्रहामुळे ते घरी थोडावेळ निवांत बसले. त्यावेळी किशोर कुमार यांच्या आवाजातील “पल पल दिल के पास” हे गाणे ऐकू आले आणि दादांच्या आठवणींनी डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटल्याचे त्यांनी लिहिले आहे. अजितदादांना किशोरकुमार यांची गाणी खूप आवडत असत. गाडीत प्रवास करताना संग्रामने दिलेला पेनड्राइव्ह लावायला ते सांगत आणि गाण्यांवर चुटकी वाजवत स्वतःही गुणगुणत असत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

“माझे अस्तित्व, माझी ओळख आणि माझे आयुष्य याचे कारण अजितदादा होते,” असे भावनिक शब्दांत त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या सहवासामुळे महाराष्ट्रभर असंख्य स्नेहसंबंध जुळले, असेही त्यांनी लिहिले. दादांच्या आठवणींनी मन हेलावले असले तरी त्यांच्या कुटुंबासोबत ठामपणे पुढे चालत राहण्याचा निर्धारही मुसळे यांनी व्यक्त केला आहे. कवि ग्रेस यांच्या “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे” या ओळी उद्धृत करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अजितदादा-जनतेतील महत्त्वाचा दुवा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्ते, नागरिक आणि भेटीगाठीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असायची. विविध कामांसाठी आलेल्या अनेकांना या गर्दीत दादांना थेट भेटणे कधी कधी शक्य होत नसे. अशा वेळी दादा आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचा महत्त्वाचा दुवा म्हणून सुनीलकुमार मुसळे यांचे नाव पुढे येत असे. बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि शक्य तितक्या लवकर दादांपर्यंत त्यांच्या अडचणी पोहोचवणे ही भूमिका त्यांनी सातत्याने निभावली. सध्या मुसळे हे विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Sunil kumar musale has written an emotional post about ajit pawar on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • maharashtra
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी भेट! घोडबंदर-भाईंदर बोगदा, मेट्रो विस्ताराला हिरवा कंदील
1

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी भेट! घोडबंदर-भाईंदर बोगदा, मेट्रो विस्ताराला हिरवा कंदील

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट
2

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट

MHT CET PCB Result : पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

MHT CET PCB Result : पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Pratap Sarnaik : घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती
4

Pratap Sarnaik : घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.