Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti: बजेटच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची कोपरखळी; फडणवीस म्हणाले, “अदलाबदली झाली तरी…”

Maharashtra Budget 2025: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2025 | 06:41 PM
Mahayuti: बजेटच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची कोपरखळी; फडणवीस म्हणाले, "अदलाबदली झाली तरी..."

Mahayuti: बजेटच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची कोपरखळी; फडणवीस म्हणाले, "अदलाबदली झाली तरी..."

Follow Us
Follow Us:

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी काय मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. कृषी, आरोग्य, जलयुक्त शिवार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान लाडक्या बहीणींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. बजेट सादर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि पवार यांना कोपरखळी मारल्याचे समजते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तव्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्यावेळेस देखील आम्ही तिघे होतो. आता फक्त खुर्च्यांची अदलाबदली झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी ते काही तुमच्या मनातून जाता जात नाही असे उत्तर दिले. त्यावर परत अदलाबदल झाली असली तरी टीम तीच असे म्हणत शिंदे यांनी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  दरम्यान अदलाबदली झाली असली तरी बदलाबदली झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

विधानसभा निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. सरकारने जाहीर केलेला हा अर्थसंकल्प हा अंत्यत बोगस आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. केवळ थापा मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडक्या कंत्राटदारांनी हा  अर्थसंकल्प गिळला आहे, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

Uddhav Thackeray : ‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या नाहीत. तर शेतकऱ्यांच्या विजेच्या थकबाकीचे काय करणार ? हे स्पष्ट केले नाही तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केली नाही. मुंबईसाठी 64 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सर्वसामान्यासाठी नाहीत तर केवळ हे सर्व कामे गुत्तेदारासाठी (कॉन्ट्रॅक्टर) आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे केली.

 

Web Title: Cm devendra fadnavis dcm ajit pawar and eknath shinde press conefrence after present maharashtra budget 2025 politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Budget 2025
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
1

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले
2

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
3

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
4

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.