Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा; पंढरपुरात विठुरायाचा जयघोष

"बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे. महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो'', अशी प्रार्थना आज विठुरायाच्या चरणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2026 | 07:32 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा सोहळा शनिवारी (दि.25) पहाटे पार पडला. पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक विधींनुसार हा सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा करण्यात आली.

यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव ) यांना महापुजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थनाही केली. त्यांनी “बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे. महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस पडू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो”, अशी प्रार्थना आज विठुरायाच्या चरणी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे तीनच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला.

दिल्लीत विठू माऊलीचा गजर ! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात, पंढरपूर वारी’वरील माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरु होती. त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

केंद्रीयमंत्र्यांचीही उपस्थिती

यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. सीईओ कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्ष प्रणिता भालके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेकांचा गौरव

यंदाच्या आषाढी वारीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमांद्वारे लाखो वारकऱ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य व निवाऱ्याचे सुयोग्य नियोजन करून सेवाभावाचा नवा आदर्श निर्माण केला गेला. ३५ लाख भाविक येऊनही शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणाऱ्या डॉक्टर, स्वयंसेवक आणि स्वच्छतादूतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी गौरव करण्यात आला.

Web Title: Cm devendra fadnavis did official mahapuja of lord vitthal accompanied by his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:18 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.