Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Agniveer in Maharashtra Police : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतणाऱ्या अग्निवीरांना पोलीस आणि इतर सरकारी सेवांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच दुष्काळाच्या निकषांबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 06:36 PM
Agniveer in Maharashtra Police

Agniveer in Maharashtra Police

Follow Us
Follow Us:
  • चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दलात संधी मिळणार.
  • अग्निवीरांसाठी परीक्षा आणि नव्या ट्रेनिंगची अट नसून वयात चार वर्षांची सूट दिली जाणार.
  • दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या भागांनाही ठराविक निकषांच्या आधारे मदतीचा मार्ग खुला होणार.
 

Agniveer in Maharashtra Police : महाराष्ट्रातील अग्निवीरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतणाऱ्या अग्निवीरांना राज्यातील पोलीस दलासह विविध सरकारी सेवांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पोलीस दलासाठी 25 टक्के अग्निवीरांना संधी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. याशिवाय त्यांना वयात चार वर्षांची सूट देण्यात येणार असून परीक्षा किंवा नव्याने प्रशिक्षण घेण्याची अट नसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्याच्या कॅबिनेट बैठकीत आज महत्वाच्या निर्णयांचा धडाका लावण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या (मंगळवार, 29 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत अग्निविरांपासून सर्किट बेंचपर्यंत 10 मोठे निर्णय घेण्यात आले.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचा चार वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होत असल्याचं सांगितलं. “केंद्राच्या योजनेनुसार काही अग्निवीर सैन्य दलात कायम राहतील, तर उर्वरित अग्निवीरांना विविध सरकारी सेवांमध्ये संधी मिळणं आवश्यक आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

“राज्य सरकारने अग्निवीरांसाठी आधीच 10 टक्के समांतर आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय माजी सैनिकांच्या श्रेणीतही त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सैन्य दलातील चार वर्षांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“फायरमन म्हणून नियुक्ती झालेल्या अग्निवीरांना संबंधित प्रशिक्षण पूर्ण करण्याची अट ठेवण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा कालावधी एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचं बंधन असेल. एवढंच नाही तर आवश्यक पदांची संख्या कमी पडली तर अतिरिक्त पदांची निर्मिती करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांना सामावून घेण्याची भूमिका सरकारने घेतली आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

नौदलातून सेवा पूर्ण करून परतणाऱ्या अग्निवीरांचा अनुभव कोस्टल सिक्युरिटीसाठी उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे अशा अग्निवीरांना किनारी सुरक्षा व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी पदांची शिथिलता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली. काही तालुक्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं असलं तरी ते विद्यमान दुष्काळी निकषांमध्ये बसत नसल्याची बाब मंत्र्यांनी मांडली होती. अशा परिस्थितीत ट्रिगर-2 मधील काही निकषांचा विचार करून, गरज भासल्यास त्या भागांनाही दुष्काळाचे लाभ देण्याची कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेवर मंत्रिमंडळाची उपसमिती देखरेख करणार आहे. तालुक्यापुरतंच मर्यादित न राहता मंडळ पातळीवरही मदतीचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे दुष्काळाच्या निकषांमुळे मदतीपासून वंचित राहू शकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

Web Title: Agniveer in maharashtra police devendra fadnavis announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Cabinet Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
1

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
2

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
3

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.