Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका

NCP on Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवून त्यांचा अपघाताच्या कटकारस्थानाशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 07:54 PM
umesh patil on rohit pawar

umesh patil on rohit pawar

Follow Us
Follow Us:
  • मफलर मॅन प्रकरणावर उमेश पाटलांची पत्रकार परिषद
  • फडणवीसांचा फोटो दाखवून आरोप करणं चुकीचं – पाटील
  • CID, CBI आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तपासाची मागणी
 

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे. ‘मफलर मॅन’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत VSR कंपनीच्या मालकांशी संबंधित राजकीय संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. (NCP on Rohit Pawar)

रोहित पवारांनी केलेल्या आरोपानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप सह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी रोहित पवारांच्या आरोपांना धुडकावून लावत त्यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.

त्यांच्या या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज (17 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

फडणवीसांवर आरोप करणं चुकीचं!

रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवून त्यांना दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांशी उमेश पाटील यांनी असहमती दर्शवली. ‘सार्वजनिक कार्यक्रमात अनेक नेते लोकांना भेटतात, फोटो काढतात. प्रत्येकाची पार्श्वभूमी त्यांना माहिती असतेच असं नाही. केवळ फोटो दाखवून मुख्यमंत्र्यांचा अजितदादांच्या अपघातातील कटकारस्थानाशी संबंध जोडणं बालिशपणाचं आहे,’ असं पाटील म्हणाले.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या राजकीय आरोपांचा निषेध करतानाच VSR कंपनीसंदर्भातील मुद्दे मात्र गंभीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

VSR कंपनीची कंत्राटं रद्द करा!

VSR कंपनीवर मानवी तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, ड्रग्ज आणि काळ्या पैशाच्या गुंतवणुकीसंदर्भात जे आरोप झाले आहेत, ते सत्य असल्यास अत्यंत गंभीर बाब आहे, असं उमेश पाटील म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या कंपनीची सर्व कंत्राटं तातडीने रद्द करावीत. तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची संबंधित तपास यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

CID, CBI कडून चौकशीची मागणी

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या मनातील संशय दूर होणं गरजेचं आहे. रोहित पवार यांनी मांडलेली कागदपत्रं आणि मुद्दे CID, CBI तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे देऊन सखोल चौकशी करावी, असं पाटील यांनी सांगितलं.

कंपनीला देशभरात व्यवसाय करता येणार नाही, यासाठी केंद्र सरकारकडेही बंदीची मागणी करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

टेंडर प्रक्रियेचीही चौकशी करा!

अजित पवारांनी विमानसेवेसाठी अंतिम केलेल्या टेंडरमधील अटी आणि शर्ती कायम ठेवाव्यात. या टेंडरला विरोध कोणी केला, कोणते प्रशासकीय अधिकारी सहभागी होते आणि केंद्रीय मंत्रालयातील कोणाचा हस्तक्षेप होता, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, रोहित पवारांचा कल अपघाताच्या तपासापेक्षा प्रसिद्धी मिळवण्याकडे अधिक असल्याची टीकाही उमेश पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचं स्वागत करत अजितदादांच्या अपघाताचा तपास लवकर पूर्ण करून सत्य महाराष्ट्रासमोर आणावं, अशी मागणी पाटील यांनी केली.

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

💡

Frequently Asked Questions

  • Que: उमेश पाटील यांनी रोहित पवारांच्या कोणत्या आरोपावर आक्षेप घेतला?

    Ans: रोहित पवार यांनी 'मफलर मॅन' म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवून त्यांच्यावर VSR कंपनीच्या मालकांना वाचवण्याचा आरोप केला होता. केवळ फोटोच्या आधारे मुख्यमंत्र्यांचा अपघाताच्या कटकारस्थानाशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे उमेश पाटील म्हणाले.

  • Que: उमेश पाटील यांनी VSR कंपनीबाबत काय मागणी केली?

    Ans: VSR कंपनीची महाराष्ट्रातील सर्व सरकारी कंत्राटं रद्द करावीत, आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी आणि आवश्यक पुरावे गोळा करून कंपनीच्या देशभरातील व्यवसायावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

  • Que: अजित पवार विमान अपघात प्रकरणात कोणत्या तपासाची मागणी करण्यात आली?

    Ans: CID, CBI, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांनी सर्व बाजूंनी चौकशी करावी. विमानसेवेच्या टेंडर प्रक्रियेतील निर्णय आणि कथित प्रशासकीय हस्तक्षेपाचीही चौकशी करावी, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.

Web Title: Ncp on rohit pawar umesh patil reaction vsr company vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • CM Devendra Fadnavis
  • NCP News
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • Umesh Patil

संबंधित बातम्या

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल
1

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!
2

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!
3

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
4

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.