Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांचा अपघात की घातपात?’ भास्कर जाधवांचा सरकारला सवाल, मफलर मॅनवरून उपस्थित केले प्रश्न

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अपघात होता की घातपात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 10:04 PM
Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या विमान अपघातावरून भास्कर जाधवांचा सवाल
  • अपघात की घातपात? सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी – जाधव
  • रोहित पवारांकडून सातत्याने तपासाचा मुद्दा उपस्थित
 

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. या प्रकरणाचा तपास आणि त्यातून समोर येणाऱ्या प्रश्नांवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. अजितदादांचा मृत्यू नेमका अपघात होता की घातपात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताला अनेक महिने उलटले, तरी या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले. रोहित पवार सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणाबाबत स्पष्ट माहिती समोर येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

अजितदादांचा अपघात होता की घातपात, याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संशय वाढत असल्याचं मत जाधव यांनी व्यक्त केलं. या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

मफलर मॅनच्या पूर्वइतिहासाची चौकशी करा!

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मफलर मॅनच्या मुद्द्यावरही भास्कर जाधव यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटोज VSR कंपनीच्या मालकांसोबत असल्याचे दाखवत रोहित पवारांनी फडणवीसच मफलरमॅन असल्याचं सांगितलं आहे. यावर भास्कर जाधव यांनी फडणवीसांचं नाव न घेता ‘संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासला पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी त्यांनी शिवसेनेतील फुटीच्या काळातील घटनांचाही उल्लेख केला. सुरुवातीला आमचा या घडामोडींशी संबंध नाही, अशी भूमिका घेतली जात होती. मात्र, नंतर पडद्यामागे नेमकं काय घडलं, याबाबत संबंधितांकडूनच माहिती समोर आली होती, असं जाधव म्हणाले.

कानटोप्या आणि मफलर घालून एकमेकांना भेटण्याच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे मफलर मॅनच्या मुद्द्यावरही अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजितदादांच्या मृत्यूचं सत्य कधी समोर येणार?

दरम्यान, या प्रकरणात रोहित पवार यांनी 23 मार्च 2026 रोजी बंगळुरू येथे Zero FIR दाखल केली होती. ही FIR पुढे महाराष्ट्राकडे वर्ग करण्यात आली असून CID ने सुरू असलेल्या तपासात तिचा समावेश केला आहे.

मात्र, अपघातामागे तांत्रिक त्रुटी, निष्काळजीपणा की अन्य काही कारण आहे, याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

त्यामुळे तपास यंत्रणांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन अजितदादांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आणावं, अशी मागणी आता राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत भास्कर जाधव यांनी काय सवाल केला?

    Ans: अजित पवार यांचा मृत्यू विमान अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात होता, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि तपासातील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

  • Que: मफलर मॅन प्रकरणावर भास्कर जाधव काय म्हणाले?

    Ans: रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मफलर मॅनच्या मुद्द्यावर भाष्य करत संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासण्याची गरज असल्याचे जाधव म्हणाले. शिवसेना फुटीच्या काळातील घटनांचाही त्यांनी उल्लेख केला.

  • Que: अजित पवार विमान अपघात प्रकरणात FIR दाखल झाली आहे का?

    Ans: होय. 23 मार्च 2026 रोजी रोहित पवार यांच्या तक्रारीवर बंगळुरू पोलिसांनी Zero FIR दाखल केली होती. त्यानंतर ती महाराष्ट्राकडे वर्ग करण्यात आली. CID ने ही FIR सुरू असलेल्या अपघाती मृत्यूच्या तपासात समाविष्ट केल्याचे सांगितले आहे.

Web Title: Bhaskar jadhav question ajit pawar plane crash muffler man investigation vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Bhaskar Jadhav
  • CM Devendra Fadnavis
  • rohit pawar

संबंधित बातम्या

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका
1

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल
2

Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!
3

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!
4

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.