Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: ​लाखो मुंबईकरांच्या मदतीला धावून आले ‘देवाभाऊ’; ‘या’ प्रकरणात रहिवाश्यांना दिलासा​

मुंबई महापालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र अर्थात OC मिळालेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2025 | 09:28 PM
Mangal Prabhat Lodha: ​लाखो मुंबईकरांच्या मदतीला धावून आले ‘देवाभाऊ’; ‘या’ प्रकरणात रहिवाश्यांना दिलासा​
Follow Us
Close
Follow Us:

भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने हजारो कुटुंबांना येत आहेत समस्या
नगरविकास विभागाने धोरण निश्चित करण्याचे निर्देश
मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले होते पत्र

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत गेली अनेक वर्ष हजारो कुटुंब भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतीत राहत असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबर पर्यंत नगरविकास विभागाने यासंदर्भात धोरण निश्चित करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ​

​मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतीत वास्तव्यास असलेल्या लाखो रहिवाश्यांनी व्यथा मांडली होती. लोढा यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरु ठेवला होता. या समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार , मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार  अमित साटम , माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शतशः आभार व्यक्त करतो. या समस्येसंदर्भात काही दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार माझे सहकारी आशिष शेलारजी, अमित साटम  . माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बैठक घेऊन या संदर्भात धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे मी मनापासून स्वागत करतो. लाखो मुंबईकरांसाठी देवभाऊ धावून आले असेच यावेळी म्हणावे लागेल असेही लोढा यांनी नमूद केले.

मुंबईकरांना महायुती सरकारचा दिलासा! मुंबईतील हजारो इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याबाबत राज्याचे मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मी एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि माझे… pic.twitter.com/nbcs4j6V9r — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 11, 2025

मुंबई महापालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र अर्थात OC मिळालेली नाही. अशा इमारतींची संख्या तब्बल २५ हजारांवर असून, लाखो कुटुंब या इमारतींमध्ये राहत आहेत. इमारत बांधणारे विकासक आणि बिल्डरांच्या त्रुटी किंवा तत्कालीन नियमावलीतील पळवाटा यामुळे अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या रहिवाश्यांना सांडपाणी निचरा, वीज जोडणी, मालमत्ता कर भरणे, गृहनिर्माण सोसायटी स्थापन करता न येणे अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर या रहिवाश्यांना पाणी पुरवठा करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्या निदर्शनाला आणून दिले होते.

​दरम्यान, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींसंदर्भात होणाऱ्या धोरणात पुढील बाबींचा समावेश होणार आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा.सोसायट्या एकत्रित किंवा वैयक्तिकरीत्या प्रस्ताव देऊन पार्ट-ओसी मिळवू शकतील.​ पहिल्या सहा महिन्यांत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.​ मात्र अतिरिक्त वापरलेला एफएसआय असल्यास त्यासाठी प्रीमियम भरावा लागणार​ आहे.​ येत्या २ ऑक्टोबर​पर्यंत हे धोरण निश्चित होणार असल्याने लाखो मुंबईकरांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: Cm devendra fadnavis help to many families occupancy certificate mangl prabhat lodha mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 09:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
3

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
4

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.