Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे…”; दावोसमधून काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2026 | 08:00 PM
“महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे…”; दावोसमधून काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात 15 लाख रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज 
आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
गतवर्षीच्या टप्पा ओलांडून, यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास

दावोस: भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले.

Maharashtra @ Davos 2026 🤝 MoU Signed between Govt of Maharashtra & Yeoman Marine Services Pvt. Ltd. Total investment: ₹1050 crore
Employment: 1575
Sector: Ship Building Region : Ratnagiri /Konkan CM Devendra Fadnavis & Mr. Dhananjay Mishra, Chairman & MD witnessed the… pic.twitter.com/nNIqmGWK4h — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 20, 2026

तत्पूर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी  मनोदय भावनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis said maharashtra will emerge as powerhouse of indias future davos summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devendra Fadnavis
  • Investments

संबंधित बातम्या

Budget 2026: इन्कम टॅक्स कायद्यात होणार मोठे फेरबदल! टॅक्स स्लॅबपासून HRA पर्यंत; काय बदलणार? जाणून घ्या
1

Budget 2026: इन्कम टॅक्स कायद्यात होणार मोठे फेरबदल! टॅक्स स्लॅबपासून HRA पर्यंत; काय बदलणार? जाणून घ्या

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका
2

Davos Wef 2026: लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार, दावोसमध्ये CM फडणवीसांचा धडाका

राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…
3

राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
4

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.