Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “राज्यात ‘व्होट जिहाद’ पार्ट 2 सुरू झालाय”; मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं म्हणायचयं काय?

शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पार पडले. भाजपच्या शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 13, 2025 | 02:38 PM
Devendra Fadnavis: "राज्यात 'व्होट जिहाद' पार्ट 2 सुरू झालाय"; मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं म्हणायचयं काय?

Devendra Fadnavis: "राज्यात 'व्होट जिहाद' पार्ट 2 सुरू झालाय"; मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं म्हणायचयं काय?

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी: शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेषनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. तसेच राज्यातील अनेक भाजपचे बडे नेते देखील उपस्थित होते. भाजपच्या शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी महायुतीला आणि खास करून भाजपाला विधानसभेत मिळालेल्या यशाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. दरम्यान या शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपामध्ये  श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले आणि नाही समजला ते अयशस्वी झाले. महाराष्ट्रात आपल्याला जो महावविजय प्राप्त झाला आहे, त्याबद्दल मी साष्टांग दंडवत घालतो. लोकसभा निवडणुकीनन्यत्र पक्ष निराश झाला होता. त्यानंतर अमित शहा यांनी राज्याचा दौरा केला. त्यांनी मनात आत्मविश्वास दिला. त्यानंतर संपूर्ण पक्ष उभा राहीला आणि महाराष्ट्रात विजय खेचून आणला. ”

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “लोकांची सेवा करणे ही राज्यकर्ता म्हणून आमची आणि कार्यकर्ता म्हणून तुमची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात अराजकतावादी शक्तींचा प्रभाव होता. राज्यात व्होट जिहादचे राजकरण झाले. निवडणुकीत पराभव झाला तरी ते शांत बसले नाहीत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांग्लादेशी मतदार याद्यांमध्ये घुसवले जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झाला आहे. ”

समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचा आहे. सरकारप्रमाणे पक्षालाही 100 दिवसांचे टार्गेट द्या. त्यातील पहिले म्हणजे दीड कोटी सदस्य संख्या बनवणे हे ध्येय असले पाहिजे. आपण सुरू केलेल्या योजना आपण बंद करणार नाही. सरकारचे कार्यक्रम प्रत्येकापर्यंत कसे पोहोचतील यासाठी काम करावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यांत होऊ शकतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. विधानसभेप्रमाणेच येणारया निवडणुकीत देखील वजजय मिळवायचा आहे.

राजकारणात काहीही शक्य’; CM देवेंद्र फडणवीस

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला अपयश आलं. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची एक ते दोन वेळा भेट घेतली. या भेटींमुळे राज्यात पुन्हा नवी समीकरण पाहायला मिळणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर आज फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Devendra Fadnavis : ‘राजकारणात काहीही शक्य’; CM देवेंद्र फडणवीस यांचं सूचक निधान

नागपूरमध्ये आज जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस याची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांना विविध राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यावर फडणवीसांनीही आपल्या शैलित प्रश्नांची ‘राजकीय’ उत्तरं दिली. यावेळी राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळ्यापणे उत्तरे दिली.

 

Web Title: Cm devendra fadnavis said vote jihad part 2 mva maharashtra election 2024 shirdi bjp summit 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • BJP
  • shirdi

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
2

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?
3

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन
4

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.