Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Ravindra Chavan : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोलकाता येथील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले.:

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 07:18 PM
Ravindra Chavan

Ravindra Chavan

Follow Us
Follow Us:
  • ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण,’ – रवींद्र चव्हाण
  • पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळाच्या बैठकीतील अमित शाहांचा भाषणाचा व्हिडिओ पोस्ट
  • राहुल गांधींवर निशाणा, काँग्रेसच्या पराभवावर आत्मचिंतन करण्याची गरज
 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. चव्हाण यांनी सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या राजकारणावर टीका केली. ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण!’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

रविंद्र चव्हाणांची काँग्रेसवर जोरदार टीका

रविंद्र चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या राज्यांमध्ये अनेक वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही, तिथे काँग्रेसच्या मित्रपक्षांची सत्ता होती, असा मुद्दा त्यांनी मांडला.

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

‘व्होट चोरी’चे आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते या राजकीय परिस्थितीवर बोलत नाहीत, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. याच संदर्भात त्यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणीचा वापर करत काँग्रेसवर निशाणा साधला. चव्हाण यांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्र भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार मिळाली आहे.

अमित शाह यांनी कोलकात्यात काय म्हटलं?

रविंद्र चव्हाण यांनी शेअर केलेला व्हिडिओ पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळाच्या बैठकीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या राजकीय कामगिरीवर टीका केली.

अमित शाह यांनी काँग्रेसने पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला देशातील मतदारांकडून वारंवार पराभवाचा सामना करावा लागत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, ‘इंडिया आघाडी’मध्ये फूट पडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग

रविंद्र चव्हाण यांनी अमित शाह यांच्या भाषणाचा आधार घेत काँग्रेसवर टीका केली आहे. विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, चव्हाण यांची ही पोस्ट भाजपची राजकीय भूमिका मांडणारी असली, तरी त्यातील दावे हे राजकीय नेत्यांचे आरोप आहेत. या मुद्द्यांवर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Web Title: Ravindra chavan criticizes congress rahul gandhi amit shah video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Rahul Gandhi
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट
1

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
2

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकलच्या प्रश्नांवर रविंद्र चव्हाण मैदानात
4

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकलच्या प्रश्नांवर रविंद्र चव्हाण मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.